मुंबई : आज, चित्रपट कलाकारांची फॅन फॉलोइंग इतकी आहे की, लोकं त्यांची एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात. त्याचबरोबर, सर्व चित्रपट रसिकांना त्यांच्या आवडत्या स्टार्सबद्दल अधिकाधिक जाणून घेणं, त्यांचे जुने फोटो पाहणं, अशा गोष्टी आवडतात. दरम्यान, आज आम्ही तुमच्यासाठी बॉलीवूडच्या दोन मोठ्या स्टार्सचे बालपणीचे फोटो घेऊन आलो आहोत. हा फोटो पाहून तुम्हाला दोघांची नावं सांगता येतील का?  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 हे भाऊ आहेत स्टार्स
फोटोत दिसत असलेल्या दोन मुलांमध्ये रक्ताचं नातं आहे. खरंतर दोघंही एकमेकांचे खरे भाऊ आहेत. आजच्या काळात हे दोघंही बॉलिवूडचे मोठे स्टार आहेत. तसेच त्यांना आणखी एक भाऊ आहे. तोही अभिनयाशी संबंधित आहे. त्याच्या वडिलांनी बॉलीवूडला अनेक उत्तम चित्रपटांच्या कथेचा आशीर्वाद दिला आहे. तुम्हाला अजूनही यांना ओळखता आलं नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो. 


या दोन्ही भावांनी आत्तापर्यंत अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याचबरोबर दोघंही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसले आहेत. फोटोत दिसणारा लहान मुलगा आता अभिनयापेक्षा चित्रपट निर्मितीत जास्त सक्रिय झाला आहे. तर लोकं मोठ्या मुलाची चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. त्याचबरोबर, असं मानलं जातं की, त्याची फॅन फॉलोइंग इतकी मजबूत आहे की त्याचे चित्रपट त्याच्या नावानेच हिट होतात. चित्रपटसृष्टीत त्यांचे बरेच वर्चस्व आहे आणि ते त्यांच्या दबंग शैलीसाठी ओळखली जातात.


हे स्टार दुसरे कोणी नसून सलमान आणि सोहेल खान आहेत. फोटोत दिसणारा मोठा मुलगा सलमान खान आहे, तर लहान मुलगा सोहेल खान आहे. त्याचबरोबर, आज प्रमाणेच या जुन्या फोटोमध्ये सलमान दबंग स्टाईलमध्ये दिसत आहे. तर सोहेल या फोटोत स्माईल देताना आहे.