मुंबई : बॉलिवुडमध्ये #MeToo वर एकामागे एक खुलासे होत आहेत. या यादीत आतापर्यंत नाना पाटेकर, संस्कारी आलोक नाथ, विकास बहल आणि कैलाश खेर यांच्यासह अनेकांवर आरोप झाले आहेत. याशिवाय सुभाष घई, पियूष मिश्रा आणि दिग्दर्शक साजिद खान यांच्यावर देखील आरोप झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांविरोधात आरोप केल्यानंतर #MeToo चळवळ सुरु झाली. तनुश्रीने नानांवर 10 वर्षापूर्वी रिलीज झालेला सिनेमा हॉर्न ओके प्लीजच्या शूटिंगदरम्यान गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. यानंतर बॉलिवूडमध्ये 2 गट पडले आहेत. काही जण तनुश्रीच्या बाजुने आहेत तर काही जण नानांच्या बाजुने उभे आहेत. साजिद खान आणि नाना पाटेकरांवर आरोप झाल्यानंतर अभिनेता अक्षय कुमारने हाऊसफूल 4 सिनेमाचं शूटींग थांबवण्याची मागणी केली आहे.


साजिद खाननंतर आता नाना पाटेकर देखील हाउसफुल 4 सिनेमातून वेगळे झाले आहेत. आता अशी माहिती येते आहे की, नानांची जागा संजय दत्त किंवा अनिल कपूर घेऊ शकतात. या दोन्ही नावांवर सध्या विचार सुरु आहे. संजय दत्त लवकरच सिनेमात दिसण्याची शक्यता आहे.
 
संजय दत्तकडे सध्या सिनेमा नाही आहे. इतर सिनेमांचं शूटींग देखील पूर्ण झालं आहे. त्यामुळे संजय दत्तच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. साजिद खान बाहेर झाल्यानंतर त्य़ाच्या जागी साजिद-फरहादची जोडी या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे.