मार्च महिन्यात `हे` 7 चित्रपट आणि सीरिज पाहू शकता ओटीटीवर
Movies and Series on OTT in March : कोणते चित्रपट आणि वेब सीरिज मार्च महिन्यात होणार ओटीटीवर प्रदर्शित एकदा यादी पाहाच...
Movies and Series on OTT in March : मार्च महिना सुरू झालाय आणि त्यातही आता विकेंडची सुरुवात झाली आहे. या महिन्यात ओटीटीवर कोणते चित्रपट आणि सीरिज प्रदर्शित होणार आहेत किंवा काल झाले आहेत... जे तुम्ही घरी बसल्या पाहू शकतात... असा कोणता नवीन कॉन्टेन्ट आला आहे जो पाहण्याची तुम्हाला इच्छा आहे किंवा तुमच्या आवडत्या कलाकारांचे कोणते चित्रपट किंवा सीरिज तुमच्या भेटीला आले आहेत, जे तुम्ही फॅमिली किंवा मित्र-परिवारासोबत पाहू शकतात हे तुम्हाला ही जाणून घ्यायचे आहे? चला तर जाणून घेऊया...
1 मार्च
काल शुक्रवार एक मार्च रोजी दोन वेब सीरिज प्रदर्शित झाल्या आहेत. झी 5 वर असलेल्या 'सनफ्लावर' या सीरिजचा दुसरा सीझन प्रदर्शित झाला आहे. या सीरिजमध्ये सुनील ग्रोव्हर आणि अदा शर्मा महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. तर त्याशिवाय 'मामला लीगल है' ही सीरिज देखील प्रदर्शित झाली आहे.
7 मार्च
हुमा कुरैशीची लोकप्रिय सीरिज महारानीचा तिसरा भाग हा 7 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. ही वेब सीरिज तुम्ही सोनी लिव्ह या ओटीटी अॅपवर पाहू शकता.
8 मार्च
शोटाइम या वेब सीरिजविषयी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. ही वेब सीरिज करण जोहरच्या प्रोडक्शन हाउसची असून याच महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये इमरान हाश्मी, नसीरुद्दीन शाह, मौनी रॉय, महिमा मकवाना, श्रिया सरन आणि राजीव खंडेलवाल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
15 मार्च
पंकज त्रिपाठीचा 'मर्डर मुबारक' हा चित्रपट 15 मार्च रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या सस्पेंस थ्रिलर चित्रपटात पंकज त्रिपाठी हे पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. पंकजशिवाय या चित्रपटात सारा अली खान, डिंपल कपाडिया, करिश्मा कपूर, संजय कपूर, टिस्का चोप्रा आणि सुहैर नैय्यर देखील आपल्याला दिसतील.
21 मार्च
अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 21 मार्च रोजी सारा अली खानचा 'ऐ वतन मेरे वतन' प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सारा अली खान स्वातंत्र्य सैनिकाच्या भूमिकेत दिसेल. उषा मेहतानं रेडियोचा वापर करून 1942 मध्ये भारत छोडो या आंदोलनात महत्त्वाची भूमिका साकारली.
हेही वाचा : लोकप्रिय अभिनेत्रीच्या मित्राची अमेरिकेत गोळी मारून हत्या, पंतप्रधान मोदींकडे मागितली मदत
30 मार्च
'द ग्रेट इंडियन कपिल शो' हा शो 30 मार्चच्या दिवशी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या शोमध्ये कपिल शर्मा, सुनील ग्रोव्हर आणि कीकू शारदा दिसणार आहे.