छोट्या पडद्यावरील अभिनेता शोएब इब्राहिमचा आज 20 जून रोजी 37 वा वाढदिवस आहे. शोएब हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. शोएब विषयी बोलायचे झाले तर त्याचा जन्म हा 1987 मध्ये भोपाळमध्ये झाला. तर त्यानं अभिनेत्री दीपिका कक्कडशी लग्न केलं असून त्यांची भेट ही 'ससुराल सिमर का' या मालिके दरम्यान झाली. नेहमीच शोएब हा त्याच्या मुलामुळे आणि पत्नी दीपिका कक्कडमुळे सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. त्याच्या पोस्ट प्रेक्षकांना प्रचंड आवडतात देखील. तर काही नेटकऱ्यांना त्याची पोस्ट आवडत नाही. काही लोकांचं म्हणणं आहे की त्यानं त्याच्या खासगी आयुष्याला गरज नसताना इतकं सगळ्यांसमोर मांडलं आहे. त्याशिवाय तो त्याच्या आणि पत्नीच्या धर्मावरून देखील ट्रोल होतो. 


दीपिकाचं दुसरं लग्न


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शोएब- दीपिका हे दोघे वेगवगेळ्या धर्मातील आहेत. त्यामुळे त्याचं लग्न हे चांगलंच चर्चेत राहिलं आहे. दीपिका हिंदू आहे तर शोएब हा मुस्लिम. मात्र, त्या दोघांनी या पलिकडे जात एकमेकांच्या नात्याला लग्न करून नाव दिलं. दरम्यान, दीपिकाचं हे दुसरं लग्न आहे. त्याआधी तिचं लग्न झालं होतं. शोएबसोबत लग्न करण्याआधी दीपिकानं तिचा पहिला सह-कलाकार रोनक सॅमसनशी 2009 मध्ये लग्न केलं होतं. त्यांचं नातं जास्त काळ टिकलं नाही आणि त्यांना घटस्फोट घेतला आहे. असं म्हटलं जातं की त्या दोघांचा घटस्फोट होण्याचं कारण हा शोएब होता. जेव्हा शोएब दीपिकाच्या आयुष्यात आला तेव्हापासून रोनक आणि दीपिकाच्या वैवाहिक आयुष्यात अनेक समस्या सुरु झाल्या होत्या. 



रौनकचं दीपिकावर आरोप


रौनकनं दीपिकावर विवाहबाह्य संबंध ठेवल्याचे आरोप केले होते. रौनकनं त्याच्या आरोपांमध्ये म्हटलं होतं की दीपिका विवाहीत असूनही शोएबसोबत रिलेशनशिपमध्ये होती. खरंतर दीपिकानं हे सगळे आरोप खोटे असल्याचे देखील म्हटले होते. दीपिका आणि रौनकच्या लग्नाला फक्त 2 वर्ष झाले होते त्यात ते दोघं विभक्त झाले. दीपिकानं 2015 मध्ये रौनकला घटस्फोट दिला होता. 


धर्मामुळे होते ट्रोल


रौनकपासून विभक्त झाल्यानंतर दीपिका आणि शोएब यांनी 2018 मध्ये लग्न केलं. शोएबनं त्याच्या गावी मोदहाला जाऊन लग्न केलं. शोएबशी लग्न करण्यासाठी दीपिकानं धर्म बदलत स्वत: चं नाव फैजा ठेवलं. दीपिकानं घेतलेल्या या निर्णनामुळे तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आलं होतं. लग्नानंतर शोएब आणि दीपिकानं मुंबईत ग्रॅन्ड रिसेप्शन ठेवलं होतं. आता दीपिकानं मालिकांमधून ब्रेक घेतला असून ती मुलासोबत वेळ व्यथित करताना दिसते. खरंतर, आजही धर्म बदलून दुसऱ्या धर्मातील व्यक्तीशी लग्न केल्यामुळे दीपिका सतत ट्रोल होत असते.