सुपरहिट चित्रपट दिले, तरी सुपरस्टार झाला नाही कपूर कुटुंबातील `हा` अभिनेता
Birth Anniversary : या अभिनेत्यानं अनेक सुपरहिट चित्रपट दिले. पण त्यांना पाहिजे तितकं यश मिळालं नाही.
Shashi Kapoor Birth Anniversary : 60 च्या दशकात लोकप्रिय ठरलेले दिवंगत अभिनेता म्हणजेच शशि कपूर. आज ते आपल्यासोबत नसले तरी देखील त्यांच्या चाहत्यांची यादी काही कमी नाही. ते त्यांच्या काळातील अशा काही कलाकारांपैकी एक होते, ज्यांचे चाहते आज त्यांच्या निधनानंतरही आहेत. आज याच सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊया. शशि कपूर यांचा जन्म 18 मार्च 1938 मध्ये कोलकातामध्ये झाला आणि 4 डिसेंबर 2017 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये जवळपास 160 चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांचे जास्त चित्रपट हिट ठरले. मात्र, तरी देखील ते सुपरस्टार बनू शकले नाही. अखेरच्या दिवसांमध्ये देखील त्यांची परिस्थिती ही बिकट झाली होती.
शशि कपूर यांचं कुटुंब
शशि कपूर यांच्या आई-वडिलांविषयी बोलायचे झाले तर तर त्यांच्या वडिलांचं नाव पृथ्वीराज कपूर आणि आईचं नाव रामसरनी मेहरा कपूर आहे. शशि कपूर हे धाकटे भाऊ होते, त्यांना दोन मोठे भाऊ असून राज कपूर हे सगळ्यात मोठे होते. तर शम्मी कपूर ते मधले म्हणजेच दुसऱ्या नंबरचे भाऊ होते. दोन्ही भावांच्या तुलनेत शशि कपूर यांना तीन बहिणी होत्या. उर्मिला, नंदी आणि देवी कपूर. शशि कपूर यांचं खरं ना बलबीर पृथ्वीराज कपूर आहे.
शशि कपूर यांचं करिअर
शशि कपूर यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात ही एक चाइल्ट आर्टिस्ट म्हणून केली होती. त्यांनी करिअरमध्ये जवळपास 160 चित्रपट केले. पण त्यांच्या भावांना आणि पुतण्यांना जे यश किंवा लोकप्रियता मिळाली ते त्यांना मिळालं नाही. शशि कपूर यांनी चाइल्ड आर्टिस्ट म्हणून 1948 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आग' आणि 'आवारा' या चित्रपटात काम केलं. या चित्रपटात शशि यांनी त्यांचे लहान भाऊ राज कपूर यांच्या लहानपणपणीची भूमिका साकारली होती. शशि यांनी त्यांच्या वडिलांच्या पृथ्वी थिएटरमध्ये अभिनयाचे धडे घेतले होते.
शशि कपूर यांनी 1958 मध्ये त्यांची गर्लफ्रेंड जेनिफर केंडलशी लग्न केलं. त्यांची आणि शशि यांची भेट ही तेव्हा झाली जेव्हा ते लंडनमध्ये शेक्सपियरच्या इंग्लिश नाटक करायचे. त्यांनी लग्न केलं. त्यानंतर त्यांचा सुखी संसार सुरु झाला. त्यानंतर 1961 मध्ये प्रदर्शित झालेल्या यश चोप्रा यांच्या 'धर्मपुत्र' या चित्रपटात शशि कपूर यांनी मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर शशि कपूर यांना चित्रपटतर मिळू लागले, पण ते फ्लॉप होऊ लागले होते. मात्र, 1965 मध्ये प्रदर्शित झालेले 'वक्त' आणि 'जब जब फूल खिले' प्रदर्शित झाले तेव्हा ते बॉक्स ऑफिसवर सुपरहट ठरले. मात्र, जेव्हा 1984 मध्ये जेनिफर यांचे निधन झाले. त्यानंतर शशि कपूर यांच्या फिल्मी करियरला उतरती कळा लागली. . त्यांना तीन मुलं आहेत. करन, कुणाल आणि संजना अशी त्यांची नावं आहेत. शशि कपूर यांनी त्या तिघांनाही एकट्यानं मोठं केलं.
हेही वाचा : 'निर्माता आणि दिग्दर्शक...', 'आई कुठे काय करते'चा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
मिळालं नाही यश
शशि कपूर यांनी अनेक चित्रपट केले आणि त्यातील अनेक हे हीट झाले. मात्र, त्यांना त्यांच्या भावांसारखी लोकप्रियता मिळाली नाही. दरम्यान, त्यांना त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कामगिरीसाठी फिल्मफेयर आणि दादा साहेब फाळके सारखे पुरस्कार मिळाले.