`बापाच्या पैशावर...`, लग्झरीयस लाइफस्टाइलमुळे अभिनेता झाला ट्रोल, सडेतोड उत्तर देत म्हणाला...
Anil Kapoor`s Son Harsh Varrdhan : अभिनेत्यानं लग्झरीयस लाइफस्टायमुळे ट्रोल करणाऱ्याला दिलं सडेतोड उत्तर
Anil Kapoor's Son Harsh Varrdhan : बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरचा मुलगा हर्ष वर्धन कपूरनं काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण त्याला अनिल कपूर यांच्याप्रमाणे लोकप्रियता मिळाली नाही. त्याला आजही असा चित्रपट मिळाला नाही ज्यातून त्याला यश मिळू शकेल. इतकं असलं तरी ते एक स्टार किड्स म्हणून देखील लोकप्रिय आहे.
अनेकदा त्यावरुन सोशल मीडियावर त्याला ट्रोल देखील करण्यात येत आहे. दरम्यान, यावेळी ट्रोलर असं काही म्हणाला की त्याचं हर्षवर्धनला राग आला आणि त्यानं त्याला सडेतोड उत्तर दिलं आहे. त्यानं दिलेलं उत्तर हे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल देखील होत आहे. आधीचं ट्विटर म्हणजेच X अकाऊंटवरून एका नेटकऱ्यानं हर्षवर्धन कपूरला ट्रोल करण्यास सुरुवात केली. खरंतर हर्षवर्धननं X अकाऊंटवरून मॅनचेस्टर सिटी या फुटबॉल टीमला टीका करत एक पोस्ट शेअर केली आणि त्याची तुलना त्यानं 'पोंजी स्कीम' शी केली. त्यानंतर तो ट्रोलर्सचा शिकार झाला. एक नेटकरी त्याला ट्रोल करत म्हमाला की एकतरी चांगला चित्रपट कर, कधी पर्यंत वडिलांच्या पैशांना स्निकर्स खरेदी करत राहणार.
ट्रोलरची ही पोस्ट पाहिल्यानंतर हर्षवर्धननं त्याची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. हर्षवर्धन म्हणाला, मी तुझे चित्रपट कुठे पाहू शकतो? तू किती चित्रपट केले आहेस? मी रे थार, भावेश जोशी आणि ऐके वर्सेस ऐके, मिर्जिया... तू कोण आहेस? एक अपयशी व्यक्ती जो ट्विटवर त्याच्यातला कडवटपणा बाहेर आणतोय. ज्यानं अरबच्या पैशांनी श्रीमंत झाल्यानंतर शहराचे समर्थन करणं सुरु केलं आहे.
हेही वाचा : कोणती आई मुलाला व्हर्जिनिटी, शारीरिक संबंधांबद्दल विचारते? मलायका अरोरावर नेटकऱ्यांचा संताप
हर्षवर्धनच्या कामाविषयी बोलायचे झाले तर 2016 मध्ये 'मिर्जया' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. त्याआधी त्यानं 2015 मध्ये 'बॉम्बे वेलवेट' या चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं होतं. हर्षवर्धननं काही चित्रपट केले पण त्याला अनिल कपूर किंवा त्याची बहीण सोनम कपूर एवढी लोकप्रियता मिळाली नाही. हर्षवर्धन विषयी बोलायचे झाले तर तिचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर 725K फॉलोवर्स आहेत. त्याच्या पोस्टही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. इतकंच नाही तर सोशल मीडियावर सगळ्यात जास्त चर्चा ही त्याच्या स्निकर्सची असते.