4 लग्न, एका अभिनेत्रीशी विवाहबाह्य संबंध, 8 मुलांचा वडील; `या` अभिनेत्याची झलक पाहण्यासाठी तरुणींची व्हायची गर्दी, रेखाशी आहे संबंध
This Actor Has a Special Connection with Rekha : या अभिनेत्याचं रेखा यांच्याशी आहे खास कनेक्शन
This Actor Has a Special Connection with Rekha : अभिनेता जेमिनी गणेश यांनी तमिळ चित्रपटसृष्टीत स्वत: चं स्थान निर्माण केलं. शाहरुख आधी त्यांनाच 'काधल मन्नान' किंग ऑफ रोमान्स म्हटलं जात होतं. तमिळ चित्रपटसृष्टीत असलेल्या सगळ्यात मोठ्या कलाकारांपैकी एक होते. त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर सगळ्यांच्या मनात जागी केली. जेमिनी यांच्या विषयी बोलायचं झालं तर ते त्यांच्या कामासोबतच त्यांच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत राहायचे. करिअरमध्ये यशस्वी असले तरी जेमिनी गणेशन यांचं खासगी आयुष्य काही तितकं यशस्वी नव्हतं.
जेमिनी गनेशन यांचं नाव अभिनेत्री सावित्रीशिवाय अनेक महिलांसोबत लग्नाच्या चर्चा सुरु होत्या. त्यांना आठ मुलं होती, त्यातील एक अभिनेत्री रेखा आहेत. काही मीडिय रिपोर्ट्सनुसार, जेमिनी यांनी रेखा यांची आई पुष्पावल्ली यांच्याशी मंदिरात लग्न केलं होतं. पण त्यांनी कधीच लोकांसमोर रेखा यांच्या आईला पत्नी म्हणून स्वीकारलं नाही.
जेमिनी यांनी दाक्षिणात्य चित्रपटांमधील रोमान्सला एका वेगळ्या शिखरावर नेऊन ठेवले. 1971 मध्ये जेमिनी गणेशन यांना भारत सरकारनं पद्मश्री पुरस्कारा देत सन्मानित केलं. जेमिनी गणेशन हे त्या काळातील सगळ्यात जास्त शिकलेले अभिनेते होते. अभिनय क्षेत्रात येण्या आधी त्यांनी मद्रासच्या क्रिश्चियन कॉलेजमध्ये केमिस्ट्रीचे शिक्षक म्हणून काम केलं होतं. जेमिनी गणेशन यांनी त्यांच्या अभिनयाच्या करिअरची सुरुवात ही ‘मिस मालिनी’ पासून केली होती. करिअरमध्ये त्यांनी 200 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं होतं.
रेखा यांची आई पुष्पावली यांनी देखील अभिनय क्षेत्रात स्वत: चं एक स्थान निर्माण केलं होतं. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान, जेमिनी आणि पुष्पा यांच्या वाढती जवळीकता वाढू लागली होती. विवाहीत असूनही जेमिनी हे पुष्पावली यांच्या प्रेमात होते. पुष्पावली यांनी त्यांच्या स्वप्नांचा त्याग करून फक्त पत्नीचा दर्जा मिळवण्यासाठी जेमिनी यांच्याकडे गेल्या होत्या, पण ते कधी झालंच नाही. त्यांना कधीच जेमिनी यांनी पत्नीचा स्थान दिलं नाही आणि पुष्पावली या जेमिनी यांच्या आयुष्यातील दुसरी पत्नी बनून राहिल्या.
हेही वाचा : गोविंदाच्या प्रचारादरम्यान, नेमकं असं काय घडलं की सर्वांची उडाली धावपळ
दरम्यान, दिग्गज अभिनेत्री रेखा या पुष्पावली आणि जेमिनी गणेशन यांची मुलगी आहेत. रेखा यांनी त्यांच्या आई-वडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्रात करियर केलं.