अंडी विकली, टॅक्सी चालवली, हाल सोसले; पण चित्रपटसृष्टीत आल्यानंतर देव आनंद अन् राज कपूर यांनाही टाकलं मागे
या अभिनेत्यानं मानधनाच्या बाबतीत देव आनंद अन् राज कपूर यांनाही टाकलं होतं मागे
बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार येऊन गेलेत जे कायम चर्चेत होते. कारण त्यांच्या चाहत्यांना त्याविषयी सगळं जाणून घेण्याची इच्छा असते. एका चित्रपटासाठी निर्माते खूप पैसे खर्च करतात. पण तुम्हाला माहितीये का की 1950-60 च्या दशकात एका कॉमेडी कलाकाराला लीड कलाकारापेक्षा जास्त मानधन मिळायचं. ते फक्त 15 दिवसं शूटिंग करायचे आणि त्यातूनचं लाखो रुपये कमवायचे. असाच एक कॉमेडी कलाकार होता ज्यांच्याविषयी अमिताभ बच्चन यांनी देखील एक लेख लिहिला होता. त्याशिवाय अमिताभ यांनी सांगितलं होतं की या कलाकारामुळे त्यांना इतकं यश मिळालं. आता हे कलाकार कोण होते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ते आहेत कॉमेडी किंग महमूद.
महमूद यांच्याविषयी बोलायचे झाले तर त्यांनी 300 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. महमूद आज इथे नसले तरी देखील त्यांनी आयुष्यात किती स्ट्रगल केलंय. त्यांनी त्यावेळी जे काम केलं त्यानं आजही लोकांना प्रेरणा मिळते. असं म्हटलं जातं की 'किस्मत' या चित्रपटानंतर महमूद यांनी अभिनय करणं सोडलं. कारण त्यांचं कुटुंब हे आर्थिक अडचणींचा सामना करत होती. त्यानंतर काय तर महमूद हे छोटी-मोठी कामं करु लागले. इतकंच नाही तर त्यांनी राज कुमार संतोषी यांचे वडील पीएल संतोषी यांचा ड्रायव्हर म्हणून देखील काम केलं. त्याशिवाय त्यांनी अंडी देखील विकली आणि टॅक्सी चालवण्याचं काम केलं.
दरम्यान, 15 वर्षानंतर म्हणजेच 1958 मध्ये असं झालं की राज कपूर यांच्या 'परवरिश' या चित्रपटातून त्यांचं नशिब चमकलं. या चित्रपटात महमूद यांनी राज कपूर यांच्या भावाची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांना गुरु दत्त यांच्या 'सीआईडी' आणि 'प्यासा' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. महमूद यांनी 300 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र, एक लीड कलाकार म्हणून त्यांना खूप चित्रपट मिळू लागले. ते त्यांच्या विनोदांमधून प्रेक्षकांना हसवायचे. प्रेक्षकांना त्यांची कॉमेडी आवडू लागली होती. 60, 70 आणि 80 च्या दशकात त्यांना 'कॉमेडीचे किंग' अशी उपमा देखील मिळाली होती.
हेही वाचा :
महमूद यांना चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. त्यातील तीन हे 'बेस्ट कॉमेडियन अॅक्टर' होते. महमूद यांना हे पुरस्कार 'प्यार किये जा', 'वारिस' आणि 'वरदान' या चित्रपटांसाठी मिळाले होते. दरम्यान, असं म्हटलं जातं की 1962 मध्ये प्रदीप कुमार आणि मीना कुमारी यांच्या आरती या चित्रपटासाठी महमूद यांचं एक स्पेशल कॅरेक्टर तयार करण्यात आलं होतं. त्याशिवाय असं ही म्हटलं जातं की फक्त 14 दिवसात त्यानं 7.5 लाख रुपये कमावले. जे त्या काळातील सगळ्यात मोठी रक्कम आहे.