17 व्या वर्षी आई होताच इंडस्ट्रीला रामराम! लग्नानंतर 9 वर्षात पतीपासून विभक्त; आज करते सुपरहिट चित्रपट
Actress Who Became Mother at The age Of 17 : या अभिनेत्रीनं वयाच्या 17 व्या वर्षी दिला मुलीला जन्म, कुटुंबासाठी सोडली इंडस्ट्री अन् आता...
Actress Who Became Mother at The age Of 17 : लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी अगदी 16 व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यांच्या पहिल्या चित्रपटाचं नाव 'बॉबी' होतं. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर डिंपल या एका रात्रीत स्टार झाल्या. चित्रपट प्रदर्शित झाला आणि करिअरच्या पीकवर असताना डिंपल कपाडिया यांनी राजेश खन्ना यांच्याशी लग्न केलं. त्यानंतर वयाच्या 17 व्या वर्षी त्या आई झाल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला.
डिंपल कपाडिया या वयाच्या 67 व्या वर्षी दर्जेदार चित्रपट आणि सीरिज करताना दिसत आहेत. आजही त्यांचे चित्रपट आणि सीरिज पाहण्यासाठी त्यांचे चाहते आतुर असतात. आजही डिंपल या त्यांच्या हटके भूमिकांसाठी ओळखले जातात. खरंतर डिंपल यांना त्यांच्या 'बॉबी' या चित्रपटातील अभिनयानंतर त्यांना एकामागे एक चित्रपटांच्या ऑफर्स मिळू लागल्या. डिंपल कपाडियानं यांनी फक्त स्वत: यशाचं शिखर गाठलं नाही तर त्यासोबत त्यांनी राज कपूर यांच्या फिल्मी करिअरला देखील एक वेगळी दिशा दिली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की डिंपल कपाडिया यांनी कशी मदत केली. तर त्याचं आहे असं की ऋषि कपूर यांनी या चित्रपटातून अभिनेता म्हणून पदार्पण केलं होतं.
इतकं असलं तरी लग्नासाठी त्यांनी अभिनय क्षेत्राला रामराम केला होता. वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी ट्विंकलला जन्म दिला आणि कुटुंबाला प्राधान्य देत करिअरला रामराम केला. तरी सुद्धा त्यांचं वैवाहिक आयुष्य काही चांगलं नव्हतं. राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांच्या वयात खूप अंतर होतं. त्यामुळे त्या दोघांमध्ये विचारांमध्ये मतभेद होत होते आणि प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा त्यांचा एक वेगळा दृष्टिकोण होता. त्यामुळे त्यांच्यात सतत भांडणं होऊ लागली आणि एक वेळ आली की लग्नाच्या 9 वर्षानंतर राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया हे वेगळे राहू लागले.
हेही वाचा : वरुण धवन आणि समांथाचा Kissing Scene; केमिस्ट्री पाहून नेटकरी थक्क
डिंपल कपाडिया या सतत कोणत्या ना कोणत्या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसतात. त्यांचे चित्रपट हे नेहमीत सोशल मीडियावर चर्चेत असतात आणि प्रेक्षकांच्या मनावर त्यांच्या भूमिका या राज्य करतात.