राजघराण्यात जन्मलेल्या `या` अभिनेत्रीने आईमुळे दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता...
ही अभिनेत्री एका प्रसिद्ध कुटुंबात जन्माला आली. नंतर ती एक प्रसिद्ध अभिनेत्री देखील झाली आहे. आज ती बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्रींपैकी एक आहे आणि तिच्या अभिनयाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक केले जाते. या अभिनेत्रीने आपल्या आईमुळे 2 वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. काय होते यामागील कारण, जाणून घेऊयात सविस्तर
ही दिग्गज अभिनेत्री जरी राजघराण्यातील असली तरी तिच्या साठी चित्रपट सृष्टीत स्थान मिळवणे सोपे नव्हते. परंतु संधी मिळाल्यानंतर तिने स्वतःला सिद्ध करण्यात कोणतीही कसर सोडली नाही आणि राष्ट्रीय पुरस्कार जिंकण्याचा टप्पा गाठला. त्याचबरोबर, भारत सरकारकडून तिला पद्मश्री आणि पद्मभूषण यांसारखे दोन मोठे सन्मान मिळाले आहेत. ही अभिनेत्री कोण आहे हे ओळखता येईल का?
ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी आहेत. त्या प्रसिद्ध कवी कैफी आझमी आणि अभिनेत्री शौकत आझमी यांची मुलगी आहेत. शबाना आझमी यांनी दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असं त्यांच्या आई शौकत आझमी यांनी त्यांच्या आत्मचरित्र 'कैफ आणि आय' मध्ये सांगितलं आहे. पुस्तकानुसार, शबाना आझमी यांना वाटत होतं की त्यांची आई त्याच्या भावावर जास्त प्रेम करते, ज्यामुळे त्या मानसिकदृष्ट्या खूप दुःखी होत्या. या भावनात्मक तणावामुळे, शबाना आझमी यांनी एकदा प्रयोगशाळेत काही विषारी पदार्थ खाल्ले आणि एकदा त्यांनी ट्रेनच्या समोर सुद्धा गेल्या होत्या. परंतु एका वेळेस त्यांच्या मित्राने आणि दुसऱ्यावेळेस शाळेच्या चौकीदाराने त्यांचा जीव वाचवला.
शबाना आझमी यांना त्यांच्या शक्तिशाली अभिनयासाठी ओळखले जाते. त्यांच्या करिअरची सुरुवात 'अंकुर' (1974) या चित्रपटापासून झाली, ज्यामुळे त्यांनी एक सशक्त अभिनेत्री म्हणून ओळख मिळवली. त्यानंतर 'अर्थ' मध्ये त्यांनी एक भावनिक भूमिका साकारली, ज्यामुळे त्यांना मोठं कौतुक मिळालं. 'कथा' मध्ये साकारलेल्या संवेदनशील भूमिकेने त्यांची लोकप्रियता आणखी वाढवली. 'निशांत' मध्येही त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती, ज्यामुळे त्यांना बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करायला मदत झाली. त्यानंतर 'दिल से' आणि 'रंग दे बसंती' यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. शबाना आझमी यांनी विविध प्रकारच्या आणि सामाजिकदृष्ट्या प्रभावी भूमिकांमध्ये अभिनय करून बॉलिवूडमध्ये आपली एक अनोखी ओळख निर्माण केली आहे.
हे ही वाचा: https://zeenews.india.com/marathi/entertainment/akshay-kumar-shares-a-funny-dance-video-on-twinkle-khanna-50th-birthday/873906
शबाना आझमी यांनी आपल्या काही मुलाखतींमध्ये आपल्या लव्ह लाईफ आणि क्रशबद्दलही सांगितलं आहे. शबाना आझमीच्या म्हणण्यानुसार, त्या दिग्दर्शक शेखर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. काही काळानंतर दोघांचं ब्रेकअप झालं, पण दोघं पुन्हा एकत्र काम करत होते. शेखर कपूर सोबतच्या नात्याव्यतिरिक्त, शबाना आझमी यांचे शशी कपूरवर नेहमीच क्रश होते. त्यानंतर, शबाना आझमी यांचे नाते जावेद अख्तर यांच्याशी वाढले आणि त्यांनी अनेकदा त्यांची कविता त्यांचे वडील कैफी आझमी यांच्यापर्यंत पोहोचवली. जावेद अख्तर विवाहित असताना दोघांनी एकमेकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. पण हे यशस्वी होऊ शकले नाही. जावेद अख्तर यांच्या घटस्फोटानंतर शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांनी लग्न केले, मात्र या लग्नातून त्यांना अपत्य नाही.