Aryan Khan:  मध्यंतरी आर्यन खान (Aryan Khan) हे नाव सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत होतं. शाहरूखचा मुलगा आर्यन खान (Shahrukh Khan Son) अनेकदा माध्यमांमध्ये चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा त्याचं नाव हे पुढे आलं आहे आणि यावेळीही कारण मात्र तसंच आहे. (this actress has fallen in love with aryan khan learn what is the exact matter instagram story goes viral)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका अभिनेत्री आर्यन खानसाठी एक खास पोस्ट लिहिली असून ती तिनं इन्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं आर्यन खानचा फोटो (Aryan Khan Photo) टाकला आहे आणि त्यात एक हार्ट इमोजी टाकला आहे. त्यासोबतच तिनं आर्यन खानला टॅग केल्याचं दिसत आहे. ही अभिनेत्री आहे सेजल अली. सजल अली (Sajal Ali) ही एक पाकिस्तानी अभिनेत्री असून तिनं बॉलीवूडमध्येही काम केलं आहे. या पोस्टसोबतच सजलनं त्या स्टोरीमध्ये फार काही लिहिलं नाही परंतु या पोस्टमुळे त्या दोघांमध्ये काही शिजत आहे का अशी शंका नेटकरी उपस्थित करत आहेत. 


सजल अली ही एक पाकिस्तानी अभिनेत्री असून तिनं बॉलीवूडमध्येही काम केलं आहे. सजल अली 2017 मध्ये आलेल्या 'मॉम' (Mom Film) या बॉलिवूड चित्रपटातही दिसली होती. सजल अलीने श्रीदेवीच्या ऑनस्क्रीन मुलीची भूमिका साकारली होती. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या याच सजल अलीने शाहरुख खानच्या लाडक्या मुलासाठी एक प्रेमळ पोस्ट शेअर केली आहे.



काही दिवसांपूर्वी शाहरुख खानच्या मुलाने एका ब्रँडसाठी फोटोशूट केले आहे. आर्यन खान हळूहळू इंडस्ट्रीत आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. आर्यन खान लवकरच दिग्दर्शनाचा भाग होणार असल्याचेही बोलले जात आहे. तो एका स्क्रिप्टवरही काम करत आहे अशीही माहिती समोर आली आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे सहा महिने चर्चेत होता.