नेहमी चर्चेत असलेली `ही` अभिनेत्री म्हणाली, लोकं मला सेक्स वर्कर समजू लागले आहेत कारण...
टीव्ही मालिकेत सेक्स वर्करची भूमिका केल्यानंतर तिला अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं आहे
मुंबई : एका ब्रिटीश अभिनेत्रीचं म्हणणं आहे की, सेक्स वर्करची भूमिका सकारल्यानंतर तिला अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं आहे. अभिनेत्री किम्बर्ली हार्ट-सिम्पसन म्हणते की, सेक्स वर्करच्या भूमिकेनंतर अनेक लोकं तिला सेक्स वर्कर समजू लागले आणि अनेक लोकं तिला रेटही विचारू लागले.
अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिने सांगितलं की, 1960 पासून सुरू असलेल्या कॉरोनेशन स्ट्रीट या मालिकेत ती निकी व्हीटलीची भूमिका साकारत आहे. ही मालिका ITV वर दाखवली जाते.
किम्बर्लीने सांगितलं की, तिला 10 वर्षे ऑडिशन दिल्यानंतर ही भूमिका मिळाली. तिच्यासाठी हे स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे. तिने असंही सांगितलं की, सेक्स वर्कर्स तिच्याकडे जातात आणि निक्कीचं पात्र इतकं वास्तववादी बनवल्याबद्दल तिचे आभार मानतात.
किम्बर्ली हार्ट म्हणाली, साहजिकच लोकांनी मला आणि माझं पात्र मिसळलं आहे. पुरुष माझ्याकडे येऊन म्हणतात 'किती?' मला गंमत वाटते. मी डेटिंग अॅप्स वापरते आणि तिथेही अशा लोकांना भेटत असते. मी थेट त्यांना अनमॅच करते.
अभिनेत्री पुढे म्हणाली, पण मला खूप आनंद झाला आहे की धर्मादाय संस्था आणि लैंगिक कार्यकर्त्यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि सांगितलं की, त्यांना निक्कीची भूमिका आवडते. कारण ती खूप वास्तववादी आहे आणि लेखकांनी तिला ड्रग किंवा ड्रिंकची समस्या मांडलेली नाही.
किम्बर्लीने तिच्या व्यक्तिरेखेबद्दल सांगितलं की, ती एक मजबूत आई आहे. ती आपल्या मुलीसाठी आणि उदरनिर्वाहासाठी हे काम करते. हे पात्र साकारताना मला अभिमान वाटतो. मी सेक्स इंडस्ट्रीतील अनेक लोकांना ओळखते. त्या जगाबद्दल मी अनभिज्ञ नाही आणि ते लोकंसुद्धा सामान्य लोकं आहेत.
किम्बर्लीला या ड्रामा सिरीजची व्यक्तिरेखा आवडते. आणि यात आश्चर्य वाटण्यासारखी काहीच गोष्ट नाही. कारण तिला इथपर्यंत पोहोचायला 10 वर्षे लागली आहेत. किम्बर्लीला वयाच्या ८ व्या वर्षापासून अभिनेत्री व्हायचं होतं. तिचं कुटुंब कोरोनेशन स्ट्रीट ड्रामाचं मोठं चाहते होतं आणि तिला या ड्रामामध्ये काम करण्याची खूप इच्छा होती. त्यासाठी ती सतत प्रयत्न करत होती. त्यानंतर तिला या सिरीजमध्ये संधी मिळाली.
किम्बर्ली म्हणाली, आता मला एक डॉक्युमेंटरी बनवायची आहे आणि मला माझ्या कपड्यांची लाईन दुकानात लावायची आहे. ती जितकी ड्रामा सिरीजसाठी पॅशीनिएट होती. तितकीच ती हार्टवर्क बिझनेससाठी पॅशिनिएट होती. कॅम्बरली पुढे म्हणाली, मी डाउन-टू-अर्थ आहे आणि मी हॉलीवूडचं स्वप्न पाहत नाही. मी आता रिलेशनशिपच्या शोधात आहे. पुरुष असो वा स्त्री सोबत. मी डेटिंग वेबसाइटवर देखील आहे. पण तिथले बहुतेक लोकं माझ्याकडे येतात कारण मी कॉरोनेशन स्ट्रीटमध्ये काम करते.