`ही` अभिनेत्री होती `हिरामंडी`ची खरी `तवायफ`, सौंदर्यावर नवाब फिदा, नवऱ्याने गोळ्या घालून केली हत्या
Heeramandi True Story : संजय लीला भन्साळी यांची बहुचर्चित हिरामंडी वेब सीरीज रिलीज झाली आहे. प्रेक्षकांनी या सिरीजला पसंती दिली आहे. आज आम्ही तुम्हाला हिरामंडीतील एका तवायफची खरी कहाणी सांगणार आहोत.
Heeramandi True Story : Netflix वर रिलीज झालेली हिरामंडी सध्या सर्वत्र खूप चर्चेत आहे. संजय लीला भन्साळी यांनी पाकिस्तानमधील हिरामंडीमधील तवायफ यांच्या आयुष्यातील काही कल्पनिक स्वरुपात दाखविण्यात आले आहे. या वेब सीरिजमध्ये मनिषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, शेखर सुमन, फरदीन खान यांच्यासह अनेक कलाकार यात आपल्याला पाहिला मिळतात. संजय लीला भन्साळी यांची ही सीरिजचं खूप कौतुक होतंय. ही कल्पनिक कथेभोवती फिरणारी कथा असली तरी आज आम्ही तुम्हाला हिरामंडीतील एक खरी कथा सांगणार आहोत.
पाकिस्तानमधील प्रसिद्ध अभिनेत्री जी निग्गो उर्फ नर्गिस बेगम नावाने ओळखली जाते. या अभिनेत्रीने जवळपास 100 चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने सगळ्यांना वेड लावलं. ती पडद्यावर जेवढी चमकली तितकंच तिचं खासगी आयुष्य अतिशय वेदनादाय होतं.
हिरामंडीचे निगा कोण होते?
निग्गो उर्फ नर्गिसचा जन्म लाहोरच्या हिरामंडीमध्ये झाला होता. तिची आई एक तवायत होती. जी कुटुंबाला हातभार लावण्यासाठी मेळावं आणि मुजराचं कार्यक्रम घ्यायची. आईला पाहून निग्गोही त्याच दुनियेचा एक भाग होत होती. लहानपणापासून पारंपारिक नृत्य शिकणारी नग्गि इतकी पारंगत झाली की तिच्या मुजरा पाहण्यासाठी मोठी गर्दी करते होते. 40 च्या दशकात एकीकडे राजेशाही संपुष्टात येत होती दुसरीकडे चित्रपटसृष्टी आपले पाय पसरवत होती. महिलांना चित्रपटसृष्टीत जाण्यास लाज होत्या. मग अशात दिग्दर्शकाला अभिनेत्रीची गरज असायची ते तवायफच्या दारी जात होते.
अशी बनली पाकिस्तानी अभिनेत्री
एकदा निग्गो हिरामंडीमध्ये मुजरा सुरु होता. तिचा मुजरा बघण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. दुसरीकडे पाकिस्तानी निर्माता आपल्या चित्रपटासाठी अभिनेत्री शोधत होता. त्याला एका महलातून मजुराचे सूर कानी पडले त्याची पाऊले तिकडे वळली. निग्गोचं सौंदर्य, नृत्य आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून निर्माता घायाळ झाला. त्याने तिला चित्रपटाची ऑफर दिली. निग्गोला तसंही हिरामंडीचा रस्ता सोडायचा होता तिच्यासाठी ही सुवर्ण संधी होती. तिने त्या निर्मात्याला हो म्हटलं.
निग्गोच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री!
70 च्या दशकात निग्गो नावाचा बोलबाला असताना तिला निर्माता ख्वाजा मजहर यांच्या कासू या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान निग्गो ख्वाजा मजहरच्या प्रेमात पडली. एवढंच नाही तर नर्गिसने ख्वाजासोबत लग्न गाठ बांधली. निग्गो हिरामंडीतील असल्याने या लग्नाला विरोधही झाला. हा विरोध झुगाडून ख्वाजा मजहरने लग्न केलं. लग्नानंतर निग्गोचं चित्रपटात काम करणं बंद झालं.
...पण त्या कारणामुळे लग्न मोडलं!
हिरामंडीवर एक वेळ अशी आली की त्यांच्याकडे उदरनिर्वाहाचे साधन उरलं नव्हतं. अशात निग्गोला परत हिरामंडीमध्ये यांसाठी कुटुंबाने जोर लावला. पण तिने परतण्यास नकार दिला. आता हिरामंडीतील प्रथेनुसार जर देहविक्री करणाऱ्या कोणाचं लग्न शाही घरात झालं असेल तर त्यांच्या पतीला कुटुंबाला पैसे द्यावे लागायचे. निग्गोच्या कुटुंबाने ख्वाजा मजहरकडे पैशाची मागणी केली.
असा झाला निग्गोचा अंत!
अनेक प्रयत्नानंतर निग्गोच्या कुटुंबाला पैसे मिळाले नाही. एकेदिवशी निग्गोच्या आईने आजारी असल्याचा देखावा करुन तिला हिरामंडीला येण्यास भाग पाडलं. आता निग्गोच्या मनात कुटुंबातील लोक अनेक गोष्टी टाकत होते. दुसरीकडे अनेक दिवस झाले निग्गो आली नाही म्हणून मजहर काळजीत होते. ते अखेर हिरामंडीत पोहोचले तेव्हा निग्गोने परत घरी येण्यास नकार दिला. मजहरने खूप प्रयत्न केले पण निग्गो परतली नाही. 5 जानेवारी 1972 च्या दिवशी निग्गोला घरी घेऊन जाण्यासाठी मजहर पुन्हा हिरामंडी पोहोचला. परत निग्गोने जाण्यास नकार दिला पण यावेळी मजहरने खिशातून बंदूक काढली आणि तिच्यावर गोळीबार केला. त्या घटनेते निग्गोसोबत 2 संगीतकार आणि काका यांचाही मृत्यू झाला. दरम्यान निग्गोच्या हत्येप्रकरणी मजहरला जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली होती.