बाबो...! प्रसिद्ध अभिनेत्याने ११ व्यांदा दिली गुडन्यूज...
बेबी बंप फ्लॉन्ट करत इंस्टाग्रामवर फँन्सला ही गुडन्यूज दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोत हे कपल बाथटबमध्ये फोटोशूट करत असल्याचं दिसत आहेत.
मुंबई : अमेरिकन टेलिव्हिजन होस्ट Nick Cannon च्या चाहत्यांसाठी गुडन्यूज आहे. 2023 मध्ये निकच्या फॅमेलीमध्ये एक नवीन सदस्य येणार आहे. Nick ने त्याच्या सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.
Nick आणि Alyssa Scott लवकरच पालक होणार आहेत. Alyssa ने बेबी बंप फ्लॉन्ट करत इंस्टाग्रामवर फँन्सला ही गुडन्यूज दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोत Nick आणि Alyssa Scott बाथटबमध्ये फोटोशूट करत असल्याचं दिसत आहेत. फोटोमध्ये हे कपल ते आनंदाचे क्षण जगताना दिसतात.
खासकरुन Alyssa च्या चेहऱ्यावर आई होण्याचं तेज आपल्याला या फोटोत दिसू शकतं. एलिसा दुसऱ्यांदा आई होणार आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला एलिसाने सांगितलं होतं की, ब्रेन ट्यूमरमुळे तिने 5 महिन्यांचा मुलगा जेन गमावला होता.
एलिसासाठी ही वेळ कशी असावी. याचा अंदाज लावणं फार कठीण आहे. दुसरीकडे, निक 11व्यांदा वडील होणार आहे. निक 11व्यांदा वडील होणार असल्याची माहिती आहे. पण त्याआधी त्याच्या बाकीच्या मुलांबद्दल आणि बायकोबद्दल जाणून घेऊया. गोल्डन कॅनन हे निक आणि ब्रिटनी बेल यांचं पहिलं मूल आहे. ज्याचा जन्म 21 फेब्रुवारी 2017 रोजी झाला होता. यानंतर या जोडप्याने दुसऱ्या बाळाचं पॉवरफुल क्वीन कॅननचं स्वागत केलं.
तर Nick आणि त्याची एक्स वाइफ Mariah Carey जुळ्या मुलांना Moroccan-Monroe चे पेरेंट्स आहेत. Mariah नंतर Nick की वाइफ DJ Abby De La Rosa ने देखील 2021 मध्ये जुळ्या मुलांना जन्म दिला, ज्यांच नावं Zion Mixolydian Cannon आणि Zillion Heir Cannon असं आहे. तर मॉडल Bre Tiesi ने 2022 मध्ये त्यांचं बाळ Legendary Lov बेबी Legendary Love Cannon चं या जगात स्वागत केलं.
यानंतर, अमेरिकन होस्टला 2022 मध्ये मॉडेल लानिशा कोलपासून एक मुलगी देखील आहे. निक आणि लनिशा यांच्या मुलीचं नाव ओनिक्स आइस कोल कॅनन आहे. सप्टेंबर 2022 मध्ये, निकची... पत्नी ब्रिटनी बेलने त्यांच्या तिसऱ्या मुलाचं, RiseMessiah Cannon चे जगात स्वागत केलं. निकला त्याच्या मुलांसोबत मजा करायला आवडते. (This American star is going to become a father for the 11th time got a photoshoot done in the bathtub with his wife)
मुलगा जेनला गमावल्यानंतर Nick खूप बदलला आबे. निकच्या म्हणण्यानुसार तुम्हाला माहिती नसतं की आयुष्याच्या दुसऱ्या क्षणाला तुमच्यासोबत काय होणार आहे. त्यामुळे तुमच्या कुटुंबासोबत नेहमी राहा आणि त्यांना सांगा की तुमचे त्यांच्यावर किती प्रेम आहे. आनंदाची बाब ही आहे की, Nick आणि Alyssa Scott फॅमिलीत वाढ होत आहे. पुन्हा एकदा पॅरेंटहुड एंजॉय करण्यासाठी तयार आहेत. आशा करतो की दोघांचा आनंद सदैव असाच राहो.