लॉस एंजेलिस : ऑस्कर पुरस्कार सोहळा आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला असतानाच आता या सोहळ्यातील काही खास माहिती समोर येण्यास सुरुवात झाली. यामध्ये मग ऑस्करच्या रेड कार्पेटवर येणाऱ्या कलाकार मंडळींच्या ड्रेसिंग सेन्सपासूनची माहिती असो किंवा मग यंदाच्या ऑस्करमधील नामांकनं मिळालेल्या चित्रपटांच्या चर्चा असो. ऑस्कर आहे म्हटल्यावर चर्चा तर होणारच ही बाब काही नव्याने सांगण्याची गरज नाही. सातासमुद्रापार होत असणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यामध्ये ऑस्करची मानाची बाहुली कोणाला मिळो अथवा न मिळो, पण सोहळ्यावरुन परत जाताना प्रत्येकाला एक गुडी बॅग अर्थात भेटवस्तूंनी भरलेली एक बॅग भेटस्वरुपात मिळणार आहे. त्यामुळे एका अर्थी ऑस्करची आठवण ही सर्वांच्याच सोबत जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता तुम्ही म्हणाल या बॅगेत नेमकं असेल तरी काय? हा प्रश्न पडणं सहाजिकच आहे. कारण, ऑसकरकडून मिळणाऱ्या भेटवस्तू नेमक्या असतील तरी काय याविषयीचं कुतूहल दरवर्षी असतं. यंदा या गुडी बॅगमध्ये काही भन्नाट अशा गोष्टींचा मेळ साधण्यात आला आहे. चला तर मग नजर टाकूया या बॅगेत दडलंय तरी काय यावर....


हेअर ऍण्ड ब्युटी -


‘द सन’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार या बॅगमध्ये हेअर ऍण्ड ब्युटी केअरची खालील उत्पादनं असतील...


-Blush Whimsy ची लिमिटेड एडिशन रोझ गोल्ड लिप्स्टीक.


 -CBDRxSupreme ची सीबीडी, व्हीटामीन सी असणारे स्किन प्रोडक्ट्स.


 -cloSYS चा ओरल केअर सेट


 -High Beauty चं कॅनबीज फेशिअल मॉइश्चराईजर आणि फेशिअल ऑईल.


 -Instytutum चा ऍन्टी एजिंग स्किनकेअर सेट


-It's a 10 Haircare चा हेअर ड्रायर


-Knotty Floss चे विविध डेन्टल केअर प्रोडक्ट्स


 -Kusshi ची प्रवासात नेण्याजोगी मेकअप बॅग


 -Le Celine चे लक्झरी आयलॅश


-MZ Skin चा गोल्डन आय ट्रीटमेंट मास्क


-Nannette de Gaspe ची बाथ सोक ट्रीटमेंट, कर्व्ह एननहान्समेंट क्रिम आणि फेस ट्रीटमेंट


-ऑरगॅनिक हेअर प्रोडक्ट्स


 -Oxygenetix चं ऑक्सिजनेटींग फाऊंडेशन


 -Salix Care चं नॅचरल इनहॅबिटींग लोशन


-Scenterprises चं कस्टम फ्रेग्रन्स आणि त्यांच्या न्यूयॉर्क परफ्युमरीला भेट देण्याचं निमंत्रण


फॅशन-


 -AP4Good चं ऑरगॅनिक टी- शर्ट


 -Happiest Tee चे लक्झरी अमेरिकन टी शर्ट आणि स्वेटशर्ट


 -Love Is Stronger Than Hate ची टोट बॅग आणि टी शर्ट


-विविध विस्थापित महिलांसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थेशी हातमिळवणी करणाऱ्या Milliana या ब्रॅण्डच्या ऍक्सेसरीज.


-the Tragedy Assistance Program for Survivors  चं अफगाण होप ब्रेसलेट


 -Zuzu Kim चे कस्टम बो टाय  (महिला आणि पुरुषांसाठी)


प्रवास (ट्रॅव्हल)-


 -$20,000 किंमतीची the Galapagos, the Amazon किंला Costa Rica आणि Panama यांपैकी दोन बेटांवर सहल


-ग्रीसच्या हल्कीदीकी येथे लक्झरी हॉलिडे


-मेक्सिकोच्या फ्लोरा फार्म्सना भेट देण्याचं निमंत्रण


-खाण्यापिण्याच्या गोष्टी


-सेलिब्रिटी शेफच्या हातून बनलेल्या बदार्थांच्या जोडीने पूलसाईड डिनर


-CODA चे प्रिमियम कॅनबिज, टॉपिकल्स


-जेरिटोज हा एक अफलातून मेक्सि्न सोडा


-पोंटेर्लियर फ्रान्सचा व्हाईट व्हाईट ऍबसिंथ


-हॅन्डक्राफ्टेड कोका ज्वेल्स


-ग्लूटेन फ्री, डेरी फ्री आणि नैसर्गित गोडवा असणारे  Good Girl Chocolate


-Optimum Nutrition कडून देण्यात आलेले सॉल्टेड क्रिस्प बॅट


-Rouge Maple चं ऑरगॅनिक मेपल सीरप आणि गोर्मे गिफ्ट सेट