मुंबई : बॉलीवूडमध्ये, आमिर खानला 'मिस्टर परफेक्शनिस्ट'  नावाने ओळखतात. कारण तो एक असा अभिनेता आहे जो त्याच्या असामान्य निवडी आणि चांगल्या अभिनयासाठी ओळखला जातो. अशा परिस्थितीत त्याने कोणाला काही सूचना दिल्यास त्याचे म्हणणे नक्कीच गांभीर्याने घेतले जाते. असेच काहीसे घडले 'झुंड' सिनेमाच्याबाबतीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमिर खानने  'झुंड' या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांना शिफारस केली. शिफारस करून तो तेवढ्यावरच थांबला नाही तर सिनेमासाठी प्रमुख भूमिका करण्यासाठी त्यांना तयार देखील केलं. 


'झुंड' फ्लोअरवर येण्याच्या खूप आधी आमिरने चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकली होती आणि त्यानंतर तो इतका प्रभावित झाला की त्याने थेट बॉलीवूडच्या शहनशहाला हा चित्रपट करण्याचा सल्ला दिला. 



झुंड सिनेमा आज ४ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी या सिनेमाला प्रचंड प्रतिसाद देखील दिला. 


आमिरला असं वाटतं होतं की, अमिताभ बच्चन यांच्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच व्यक्ती या सिनेमाला न्याय देऊ शकत नाही. 


अमिताभ बच्चन म्हणाले की,'मला आठवतंय जेव्हा मी आमिरशी याबद्दल चर्चा केली तेव्हा त्याने मला हा चित्रपट करायला हवा असं सांगितलं आणि जेव्हा आमिर एखाद्या गोष्टीला मान्यता देतो तेव्हा काय होतं ते तुम्हाला माहिती आहे.”


अमिताभ बच्चन यांनी कुणाची साकारली कथा? 


अमिताभ बच्चन यांनी नेमकी या चित्रपटात कोणाची भूमिका साकारली होती, असाच प्रश्न कित्येकांनी विचारला आणि मग समोर आला 'झुंड'मागचा खरा चेहरा. 


क्रीडा प्रशिक्षक  विजय बरसे (Vijay Barse) यांच्या जीवनप्रवासावर हा चित्रपट आधारित आहे. ज्यांनी झोपडपट्टी भागात राहणाऱ्या मुलांना एकत्र आणत त्यांच्या जीवनाला एक ध्येय्य दिलं होतं. 


बरसे यांचा हा प्रवास तितकासा सोपा नव्हता. त्यांना बऱ्याच आव्हानांचाही सामना करावा लागला. फुटबॉल खेळण्यासाठी पहिल्यांदा जेव्हा त्यांनी ही मुलं पाहिली, तेव्हाचा प्रसंग ते आजही विसरलेले नाहीत. 


बरसे यांनी पुढे फक्त झोपडपट्टीमधील मुलांसाठीच एका स्पर्धेचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला. 2001 मध्ये त्यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेत 128 टीमचा सहभाग होता. 


बरसे यांनी तयार केलेल्या झोपडपट्टीमधील फुटबॉलचा हा प्रवास स्लम सॉकर म्हणून ओळखला जाऊ लागला. पुढे हा प्रवास अतिशय सुरेख वेगानं सर्वांनाच थक्क करत गेला.