बॉलिवूडच्या या अभिनेत्रीचे इतक्या व्यक्तींसोबत अफेयर; लग्न झालेल्या स्टारच्या देखील प्रेमात
बॉलिवूडमधील हीट चित्रपटांप्रमाणेचं अभिनेत्री आणि अभिनेत्यांचे प्रेम प्रकरण गाजत असतात.
मुंबई : बॉलिवूडमधील हीट चित्रपटांप्रमाणेचं अभिनेत्री आणि अभिनेत्यांचे प्रेम प्रकरण गाजत असतात. एका अभिनेत्याचं किंवा अभिनेत्रीचं नाव एक दोन नाही तर अनेक नावांपुढे जोडलं जातं. अशाचं चर्चा अभिनेत्री निना गुप्ता यांच्याबद्दल देखील रंगल्या. सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे निना गुप्ता यांचं वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचे माजी कर्णधार विवियन रिचर्ड्स यांच्यासोबत असलेलं नातं. विवियन यांच्या पूर्वी देखील निना यांचं नाव अनेक दिग्गजांपुढे जोडण्यात आलं. पण त्यांचं कोणतचं नात जास्त काळ टिकू शकलं नाही.
निना गुप्ता आणि आलोक नाथ यांच्या नात्याची चर्चा देखील तुफान रंगली होती. पण हे नातं फार काळ काही टिकू शकलं नाही. आलोक नाथ यांच्यानंतर निना गुप्ता यांच्या मनात भारतीय शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे पुत्र शारंगदेव यांनी घर केलं. निना आणि शारंगदेव यांचा साखरपुडा देखील झाला. पण काही कारणांमुळे दोघांचं लग्न होवू शकलं नाही.
त्यानंतर निना गुप्ता यांच्या आयुष्यात वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचे माजी कर्णधार विवियन रिचर्ड्स यांची एन्ट्री झाली. दोघांच्या नात्याची चर्चा आजही तितकीचं रंगत आहे. निना आणि विवियान दोघे जेव्हा रिलेशनशिपमध्ये होते, तेव्हा त्या गरोदर देखील होत्या. त्यांच्या मुलीचं नाव मसाबा गुप्ता असं आहे. हे नातं देखील जास्त दिवस टिकलं नाही. विवियन जेव्हा निना यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होते तेव्हा विवियन यांचं लग्न झालं होतं.
कठीण प्रसंगांचा सामना केल्यानंतर त्यांनी लग्न झालेल्या पुरूषांच्या प्रेमाच न पडण्याचा सल्ला सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला. विवियननंतर निना यांच्या आयुष्यात विवेक मेहरा यांची एन्ट्री झाली. 20008 साली विवेक मेहरा आणि निना यांनी लग्न केलं. आज त्या आनंदी जीवन जगत आहेत.