मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आयशा शर्मा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती चित्रपटांमध्ये कमी दिसत असली तरी तिच्या हॉट फोटोंमुळे सोशल मीडियावर ती नेहमी चर्चेत असते. नुकताच तिने आंघोळ करतानाचा स्वतःचा असा फोटो पोस्ट केला आहे ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. तिच्या या फोटोवरून चाहत्यांना नजर हटवणं कठिण झालं आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंघोळ करताना शेअर केला सगळ्यात बोल्ड फोटो
आयशा शर्माने इन्स्टाग्रामवर स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती बाथरूममध्ये शॉवर घेताना दिसत आहे. तिचा चेहरा दिसत नसला तरी या फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. या फोटोत आयशाचा आतापर्यंतचा सगळ्यात बोल्ड लूक पाहून चाहत्यांनीही तिचं कौतुक केलं आहे. युजर्सनी कमेंट सेक्शनमध्ये फायर इमोजी शेअर करुन आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.



फोटो पाहून चाहते घायाळ
आयशा शर्माने तिचा हॉट फोटो शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. ती इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते आणि तिने तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत, जे तिच्या चाहत्यांना खूप आवडतात. आयशाचा आंघोळ करतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. ज्यावर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एका यूजरने लिहिलं आहे की, हाय समर. तर अजून एकाने कमेंट करत लिहीलं की, सुपर सेक्सी. याशिवाय अभिनेत्रीचा हा फोटो खूप लाइक आणि शेअर केला जात आहे.