Popular Playback Singer Changed His Surname For Teacher : बॉलिवूडमध्ये प्लेबॅक सिंगर होऊन यशस्वी होणं ही सामान्य गोष्ट नाही. कारण तिथवर पोहोचण्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागतं. त्यात लोकप्रिय गायक जावेद अलीनं फक्त त्याच्या करिअरमध्ये स्ट्रगल केलं नाही तर त्यासोबत त्याच्या लव्ह लाईफमध्ये देखील तितकंच स्ट्रगल केलं. त्याशिवाय जावेद हुसैन हा जावेद अली कसा झाले हे आज त्याच्या वाढदिवसानिमित्तानं त्याविषयी जाणून घेऊया... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडच्या लोकप्रिय गायकांमध्ये जावेद अलीचं नाव घेण्यात आलं. ज्यानं जिन्होंने 'अर्जियां', 'तू ही हकीकत', 'गुजारिश' आणि 'श्रीवल्ली' सारखी गाजलेली गाणी गायली आहेत. जावेद अलीचा आज 42 वा वाढदिवस आहे. तर या निमित्तानं त्याला सगळेच शुभेच्छा देत आहेत. त्याला इथवर पोहोचायला किती स्ट्रगल करावं लागलं हे जाणून तुम्हीही खूप भावूक व्हाल. जावेज अलीचं सिंगिंग करिअर हे खूप जास्त यशस्वी राहिलं आहे पण त्यानं त्याच्या आयुष्यात खूप संघर्षही केला आहे. 


हेही वाचा : खच्चून भरलेल्या मरिन ड्राईव्हवर अस्वस्थ तरुणीच्या मदतीला धावले मुंबई पोलीस; पण, गर्दीच इतकी की...


जावेदचा जन्म हा 5 जुलै 1982 रोजी दिल्लीमध्ये उस्ताद हामिद यांच्या घरी झाला. ते स्वत: एक कव्वाली गायक होते. अशात जावेद आणि गायन हे लहानपणापासून सोबतं होतं. मग त्यानंतर हळू-हळू त्यानं वडील उस्ताद हामिद हुसैनसोबत कव्वाली गाण्यास सुरुवात केली. सिंगर होण्याचं स्वप्न घेऊन जावेद अली मुंबईला आला आणि त्यानंतर त्याचा संघर्ष हा सुरु झाला. जावेद अलीनं एका मुलाखतीत सांगितलं होतं की जेव्हा तो मुंबईत नवीन होता तेव्हा अनेकांना सोबत एकाच रुममध्ये रहायचा. कधी कधी तर त्याच्याकडे खाण्यासाठी पैसे नसायचे तर कभी कभी बसनं जाण्यासाठी पैसे नसायचे. त्यामुळे त्याला स्टुडियोपर्यंत चालत जावे लागत होते. जावेद अली हिंदीशिवाय मराठी, कन्नड, तमिळ, ओडिया, तेलगू आणि उर्दू भाषेत गाणी गायली आहेत. 


प्लेबॅक सिंगर नाही तर बॉलिवूडमध्ये करायचे होते या क्षेत्रात काम


जावेद अलीला बॉलिवूडमध्ये प्लेबॅक सिंगर व्हायचे नव्हते. त्याचं स्वप्न होतं की त्यानं गजल गायक व्हावे. पण तो त्याचं हे स्वप्नपुर्ती करू शकला नाही. जावेद अलीनं त्याच्या करिअरची सुरुवात ही 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बेटी नंबर 1' या चित्रपटातून केली होती. या चित्रपटात पहिल्यांदा त्यानं प्लेबॅक सिंगिंग केली होती. त्यानंतर त्यानं अनेक गाणी गायली. पण त्याला खरी ओळख कोणत्या गाण्यातून मिळाली असेल तर ते 'एक दिन तेरी राहों' हे आहे. 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'नकाब' या चित्रपटातील गाण्यानं जावेद अलीला एका रात्रीत स्टार बनवले. 


जावेद अलीनं 'एक दिन तेरी राहों' नंतर 'कहने को जश्ने बहारा है' हे सुपरहिट गाणं गालं. हे गाणं ऐश्वर्या राय आणि हृतिक रोशनच्या जोधा अकबर या चित्रपटातून आली. त्यानंतर त्यानं अनेक हिट गाणी गायली. त्यातील आणखी 'कुन फाया कुन', 'नगाडा-नगाडा', 'तू जो मिला', 'दिवाना कर रहा' आणि 'श्रीवल्ली' ही गाणी आहेत. 


नाव का बदललं?


जावेद अलीचं खरं नाव जावेद हुसैन आहे. पण त्यानं वडिलांचं नाव त्याच्या आडनावातून काढून टाकलं आणि स्वत: च्या नावापुढे अली हे नाव जोडलं. त्याच्या मागे देखील एक गंमतीशीर गोष्ट आहे. त्यानं हे त्याच्या एका जवळच्या व्यक्तीसाठी केलं होतं. जावेदनं त्याचं हे आडनाव त्याचे गुरुजी गुलाम अली यांच्या नावावरून बदललं. त्यांच्याकडून त्यानं संगीतातल्या छोट्या छोट्या गोष्टी शिकल्या. त्यानंतर जेव्हा त्याचे निधन झाले तेव्हा जावेदनं त्याच्या गुरुला श्रद्धांजली देण्यासाठी स्वत: चं आडनाव बदललं. 


लव्ह लाइफमध्ये स्ट्रगल....


जावेद अलीचं सिंगिंग करिअर हे यशस्वी असलं तरी त्याला प्रेमासाठी खूप स्ट्रगल करावं लागलं. जावेद अलीनं त्याच्या बरिचवर्ष रिलेशनशिपमध्ये असलेल्या गर्लफ्रेंड यास्मिन अलीशी लग्न केलं. पण यास्मिनशी लग्न करणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं. छोट्या पडद्यावरील एका शो दरम्यान, त्यानं पत्नीसमोर याविषयी खुलासा केला होता. जेव्हा यास्मिन ही 21 वर्षांची होती तेव्हा तिच्या वडिलांची इच्छा होती की तिनं लग्न करावं. पण त्यांना करिअर केल्यानंतर लग्न करायचं होतं. त्यावरून दोन्ही कुटुंबामध्ये वाद झाले आणि लग्न मोडायला आलं होतं. यास्मिन जेव्हा एकटी असायची तेव्हा खूप रडायची. हे तिच्या वडिलांना आवडत नव्हते आणि त्यांनी जावेदची अट मान्य केली. जावेदचं करिअर जेव्हा सेट होऊ लागलं तेव्हा यास्मिनशी लग्न केलं. त्यांना एक मुलगा देखील आहे.