Fan Fainted During Team India Victory Parade : 17 वर्षांनंतर टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाचं भारतात जंगी स्वागत करण्यात आलं आहे. 29 जून रोजी बारबाडोसमध्ये दक्षिण आफ्रिकेला फायनलमध्ये मात दिली. रोहित शर्मा कॅप्टन असलेल्या टीम इंडियानं आपल्याला तब्बल 17 वर्षांनंतर टी20 वर्ल्ड कप मिळवून दिला. त्यानंतर काल टीम इंडिया भारतात परतली. सगळ्यात आधी वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या टीम इंडियानं दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यानंतर ते मुंबईला त्यांचा हा आनंद चाहत्यांसोबत शेअर करण्यासाठी आले. यावेळी मुंबईकरांनी त्यांचे जंगी स्वागत केले. या बीसीसीआयनं वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या या टीमचा वानखेडे स्टेडियममध्ये सन्मान करण्यात आला.
मुंबईच्या या परेड दरम्यान चाहत्यांनी खूप गर्दी केली होती. या दरम्यान, अनेक चाहते हे जखमी झाले आहेत. मुंबई पोलिसांनुसार, गुरुवारी झालेल्या टी-20 विश्व कप विजेता भारतीय क्रिकेट टीमच्या परेडला पाहण्यासाठी लोकांनी मरीन ड्राइव्हवर एकत्र आलेले चाहते जखमी झाले आणि अनेकांना इतक्या गर्दीत श्वास घ्यायला त्रास होऊ लागला होता.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओत एक तरुणीला एक पोलिस कर्मचारी खांद्यावर उचलताना दिसतोय. खरंतर, त्या तरुणीला ही श्वान घ्यायला त्रास होत असल्याचे कळते तिला आजूबाजूला काय होतंय हे कळतं नव्हता आणि तिचा श्वास गुदमरत होता. त्यामुळे तिला शुद्ध नव्हती. अशात तिला तिथून बाहेर काढण्यासाठी पोलिसाला दुसरा कोणताही उपाय नसल्यानं तिला उचलून घेतलं. तरी देखील त्याला तिथून निघता येत नव्हतं.
या विजय परेड दरम्यान बेशुद्ध झालेल्या ऋषभ महेश यादव नावाच्या व्यक्तीनं 'एएनआय'ला सांगितलं की 'गर्दी वाढत गेली. मी पडलो आणि माझा जीव गुदमरायला लागला होता. मी बेशुद्ध झालो. मला जवळच्या रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. तिथे माझ्यावर उपचार करण्यात आले. आता मी ठीक आहे. तर तिथे असलेली गर्दी ही प्रचंड जास्त होती. तिथे गैरव्यवस्थापन होतं. पोलीसही सतर्क नव्हते.'
दरम्यान, जेव्हा टीमचा वानखेडेमध्ये सन्मान करण्यात आला तेव्हा या संपूर्ण टीमला बीसीसीआयनं 125 कोटींची रक्कम दिली.