मुंबई : फोटोत दिसणारं हे बाळ आता मोठं होऊन बॉलीवूडचा मोठा अभिनेता बनला आहे. आपल्या बहिणीच्या बाजूला दिसणारा हा अभिनेता फोटोत  मस्ती करताना दिसत आहे. मोठा झाल्यानंतरही तो आपल्या अतरंगी स्टाईलसाठी ओळखला जातो.   बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींसोबत त्याने  स्क्रिन शेअर केल्या आहेत. त्याचबरोबर तो त्याच्या फॅशन आणि स्टाइलमुळे चर्चेत असतो. बॉलीवूडची टॉप अभिनेत्री त्याची पत्नी आहे. हा बॉलिवूडचा एक मोठा स्टाइल आयकॉन आहे. अलीकडे तो त्याच्या फोटोशूटमुळे खूप चर्चेत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्ही अजूनही या मुलाला ओळखलं नसेल तर हा अभिनेता रणवीर सिंगचा लहानपणीचा फोटो आहे. रणवीर सिंगचा जन्म मुंबईत झाला. त्याला नेहमीच अभिनेता व्हायचं होतं, पण महाविद्यालयीन काळात त्याला अभिनयाची कल्पना फार दूरची गोष्ट वाटली आणि त्याने लेखनावर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. इंडियाना युनिव्हर्सिटी, ब्लूमिंग्टन येथून बॅचलर ऑफ आर्ट्सची पदवी घेऊन तो भारतात आला आणि ऑडिशन देऊ लागला.



2010 मध्ये, त्याने यशराज फिल्म्सच्या बँड बाजा बारात चित्रपटासाठी ऑडिशन दिलं आणि त्याची निवड झाली. रणवीर दिल्लीतील बिट्टूच्या भूमिकेत होता. बँड बाजा बारात रिलीज झाल्यानंतर हा सिनेमा हिट झाला आणि रणवीरला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 2022 साली त्याला दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आल. यानंतर त्याला एकापाठोपाठ एक चित्रपट मिळाले आणि आज त्यांची गणना मोठ्या कलाकारांमध्ये केली जाते.