मुंबई : फोटोत बहिणीसोबत दिसणारा हा मुलगा आता मोठा होऊन बॉलिवूडचा अँग्री यंग मॅन बनला आहे. त्याचे वडील देखील त्यांच्या काळातील सुपरस्टार आहेत आणि भाऊ देखील एक लोकप्रिय अभिनेता आहे. या मुलाने एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. हा मुलगा चित्रपट जगतात त्याच्या जबरदस्त डायलॉग डिलिव्हरीसाठीही प्रसिद्ध आहे. त्याच्या डायलॉग्सचं लोकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे.  या मुलाच्या सुपरस्टार वडिलांनी दोन लग्न केली आहेत आणि त्याची सावत्र आई देखील एक लोकप्रिय स्टार आहे. यासोबतच त्याच्या एका बहिणीनेही अनेक चित्रपट केले आहेत. त्यांचे कुटुंबही राजकारणात सक्रिय आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कदाचित तुम्ही आतापर्यंत या मुलाला ओळखलं असेल आणि ज्यांना हे सांगता आलं नसेल त्यांना सांगा की हा बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सनी देओलचा लहानपणीचा फोटो आहे. हा फोटो रक्षाबंधनाचा आहे, जो त्याने स्वतः त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे.


सनी देओलच्या चित्रपटांमधील अनेक डायलॉग प्रसिद्ध आहेत. गदर चित्रपटात 'हिदुस्तान जिंदाबाद था जिंदाबाद है और हमेशा रहेगा, बरसात से बचने की हैसियत नहीं, गोली बारी की बात करते है', फिल्म दामिनीचा प्रसिद्ध डायलॉग ये ढाई किलो का हाथ है, जब पड़ता है तो आदमी उठता नहीं उठ जाता है, फिल्म घातक मध्ये, सातों के सात को मारूंगा, एक साथ मारूंगा या फिर.  त्याच्या चित्रपटातील हे डायलॉग लोकांना खूप आवडले आहेत.  


 सनी देओलने तिच्या काळातील सर्वच आघाडीच्या अभिनेत्रींसोबत काम केलंय. सनीने तिच्या चित्रपट प्रवासात एकापेक्षा एक सरस चित्रपट दिले आहेत. घायल, बेताब, घातक, डर, गदर, त्रिदेव, दामिनी आणि जीत सारखे  उत्तम चित्रपट त्याने चित्रपटसृष्टीला दिले आहेत. घायलमधील त्याच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. ज्यासाठी त्याला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला.