फोटोत दिसणारा छोटा मुलगा आज चाहत्यांना लावतोय `वेड`; ओळखलं का तुम्ही?
आज आम्ही अशाच एका बॉलिवूड स्टारचा बालपणीचा फोटो घेऊन आलो आहोत
मुंबई : आजाकाल एक ट्रेंण्ड चर्चेत आहे आणि हा ट्रेंण्ड आहे सेलिब्रिटींबद्दलचा. सध्या सेलिब्रिटींच्या बालपणीचे फोटो शेअर करुन या कलाकारांना ओळखण्याचं आव्हान दिलं जात आहे. अशातच सध्या अशा एका कलाकाराचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे की जो पाहून चाहत्यांनाही 'वेड' लागेल यात काही शंका नाही. प्रत्येकालाच त्यांच्या लाडक्या कलाकारबद्दल जाणून घेण्यासाठी आवडतं.
आज आम्ही अशाच एका बॉलिवूड स्टारचा बालपणीचा फोटो घेऊन आलो आहोत, जो आज बॉलीवूडमध्ये एक मोठं नाव बनला आहे आणि जो आपल्या जबरदस्त कॉमेडी टायमिंगसाठी देखील ओळखला जातो.
कॉमेडी चित्रपटांमध्ये झळकणारा हा अभिनेता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे. आता तुम्हाला समजलंच असेल की, हा अभनेता कोण आहे. तर आम्ही तुम्हाला सांगतो की, हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता रितेश देशमुख आहे. सध्या अभिनेत्याचा 'वेड' या सिनेमाने अख्या महाराष्ट्राला 'वेड' लावलं आहे.
बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुखचे वडील विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. रितेश लहानपणी खूप खोडकर होता. एका मुलाखतीदरम्यान रितेशने सांगितलं होतं की, लहानपणी तो कुणालाही त्याचे वडील मंत्री असल्याचं सांगण्यास टाळाटाळ करत असे, तो त्याचे वडील शेतकरी असल्याचं सांगायचा. व्हायरल होत असलेल्या या फोटोत रितेश त्याची आई वैशाली देशमुखसोबत दिसत आहे.
रितेशचा आणखी एक बालपणीचा फोटो सध्या समोर आला आहे, ज्यामध्ये तो त्याचा मोठा भाऊ अमित देशमुखसोबत लहान मुलांच्या सायकलवर बसलेला दिसतोय. अमित राजकारणात सक्रिय आहे, तर रितेश अभिनय विश्वात स्वतःचं नाव कमावत आहे.
आज रितेश दोन मुलांचा पालक आहे. रितेश आणि जेनेलिया यांना रियान आणि राहिल देशमुख ही दोन मुलं आहेत. रितेश अनेकदा आपल्या मुलांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. आजकाल रितेशचा लूक खूप बदललेला दिसतो.
20 वर्ष अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर 'वेड' या सिनेमातून अभिनेता रितेश देशमुख एका आगळ्या वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे . या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिनेता रितेश देशमुखने केलं आहे.
तसंच विशेष बाब म्हणजे या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जेनेलिया देशमुख या मराठी चित्रपटात पदार्पण केलं आहे. लग्नानंतर रितेश देशमुखसोबत जेनेलिया पहिल्यांदाच मराठी सिनेमात मुख्य भूमिका साकारली आहे.