पॉर्नस्टार एकाच वेळी तिघांसोबत करणार लग्न
खरेतर हा प्रकार भलताच विचित्र आहे. पण, जपान आणि चीनसाठी तो मुळीच नवा नाही.
बीजिंग : पॉर्नस्टार सोरा ओई हिला प्रसिद्धीची काहीच कमी नाही. तरिही सध्या ती प्रचंड चर्चेत आहे. विशेष असे की, सध्या तिची चर्चा ही तिच्या कुठल्या नव्या पॉर्न सिनेमा किंवा कुठल्या एखाद्या वाद, प्रसंगामुळे नाही. ही चर्चा आहे चक्क तिच्या विवाहामुळे. आता तुम्ही म्हणाल लग्न करण्यात विषेष ते काय? लग्न तर सगळेच करतात. आता ती पॉर्नस्टार म्हणून असेल तिची चर्चा. पण, मंडळी. हे प्रकरण तसे नाही बरं..! ही बया चक्क तीन तरूणांसोबत एकाच वेळी लग्नं करणार आहे. आहे की नाही आश्चर्यकारक?
विवाह करताना पाळणार रीति-रिवाज
प्रसारमाध्यमांतून आलेल्या वृत्तानुसार लवकरच ती विवाहबद्ध होतीय आणि ते सुद्धा रीति-रिवाजानुसार. सोरा ओई हिचा विवाह टोकियोजवळील ओडाईबा येथे पार पडणार आहे. येथील रीति-रिवाजानुसार तरूणीला एकाच वेळी तीन तरूणांसोबत विवाह करावा लागतो. म्हणजेच सोरा ही केवळ आपल्या रीति-रिवाजाचे पालण करणार आहे तर. विशेष असे की, हे लग्न रीति-रिवाजानुसार होऊनही नकली असणार आहे. कारण, हा विवाह सोरा ओई स्वत: करणार नाही. तर, हा विवाह ती आपल्या कंपनीच्या वतीने एक इव्हेंट म्हणून पार पाडत आहे.
नवरदेवाला पत्नीवर हक्क सांगता येणार नाही.
कंपनीचे म्हणने असे की, लग्नानंतर तीन दिवसांनंतर कोणताही मुलगा (नवरदेव) सोरा हिच्यावर आपला हक्क सांगू शकत नाही. या लग्नाच्या माध्यमातून कंपनी त्या लोकांचे स्वप्न पूर्ण करू इच्छिते, जे लोक लग्न करण्याची इच्छा मनात बाळगतात. पण, लग्न करत नाहीत. या लग्नानंतर सोरा ओईला २.१२ लाख रूपये मानधनाच्या रूपात दिले जाणार आहेत. खरेतर हा प्रकार भलताच विचित्र आहे. पण, जपान आणि चीनसाठी तो मुळीच नवा नाही.