Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा 'बजरंगी भाईजान' हा चित्रपट सगळ्यांनाच माहित आहे. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली होती. ‘बजरंगी भाईजान’ हा सलमानचा हाईएस्ट ग्रॉसिंग चित्रपट ठरला होता. कबीर खाननं दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटाला आजही प्रेक्षक आनंदानं पाहतात. या चित्रपटाची पटकथा ही लोकप्रिय दाक्षिणात्य दिग्दर्शक एसएस राजामौली यांचे वडील विजयेंद्र प्रसादनं लिहिली होती. तर विजयेंद्र प्रसाद यांनी एका मुलाखतीत खुलासा केला होता की त्यांची इच्छा होती की त्यांचा मुलगा एसएस राजामौलीनं हा चित्रपट दिग्दर्शित करावा. मात्र, एसएस राजामौली यांनी यासाठी नकार दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजयेंद्र प्रसाद यांनी पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की "मी माझ्या मुलाला जेव्हा बजरंगी भाईजानची स्क्रिप्ट ऐकवली, तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. मी त्याला विचारलं की ही स्क्रिप्ट मी कोणा दुसऱ्याला देऊ की स्वत: कडे ठेऊ. त्यानं सांगितलं की दुसऱ्या कोणाला द्या."


त्यांनी पुढे म्हटलं की "जेव्हा बजरंगी भाईजान प्रदर्शित झाला, तेव्हा तो माझ्याकडे आला आणि म्हणाला की तुम्ही चुकीच्या वेळी मला हा प्रश्न विचारला होता. त्यावेळी मी बाहुबलीच्या क्लायमॅक्सच्या शूटिंगला घेऊन खूप तनावात होतो. त्यामुळे मी घाईत चित्रपटाला नाही म्हटलं. जर तुम्ही मला त्याच्या 10 दिवस आधी किंवा 10 दिवस नंतर विचारलता असता, तर मी हो बोललो असतो."


हेही वाचा : 'तारक मेहता...' फेम सोनू अडकणार लग्न बंधनात! कोण आहे होणारा नवरा?


‘बजरंगी भाईजान’ विषयी बोलायचे झाले तर सलमान खान महत्त्वाच्या भूमिकेत दिसला तर चित्रपटाचे दिग्दर्शन हे कबीर खाननं केले. कबीर खाननं या पटकथेला खरंच खूप सुंदर पद्धतीनं पडद्यावर दाखवले. या चित्रपटातील सगळ्याच गोष्टींनी लोकांचे लक्ष वेधले. या चित्रपटानं फक्त प्रेक्षकांची मने जिंकली नाही तर बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई देखील केली. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटानं भारतात 320 कोटींची कमाई केली तर वर्ल्ड वाईड 918 कोटींची कमाई केली. या चित्रपटात हर्षाली मल्होत्रा, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि करीना कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.