डोक्यावर पगडी असलेल्या `या` गोंडस मुलीला तुम्ही ओळखलत का?
बॉलिवूड स्टार्सबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.
मुंबई : बॉलिवूड स्टार्सबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. आजचे सक्सेस स्टार्स लहानपणी कसे दिसायचे आणि त्यांचं बालपण कसं होते. त्याचा हॉबी काय होता आणि त्यांनी शिक्षण कोठून घेतलंय? चाहते त्यांचे आवडत्या स्टार्सचा लूक, छंद, स्ट्रगल आणि त्यांच्या यशातून प्रेरणा घेत असतात. सध्या सोशल मीडियावर एका गोंडस चिमुरडीचा फोटो व्हायरल होत आहे. जी आता बॉलिवूडची स्टार अभिनेत्री आहे. पगडीमध्ये दिसणारी ही गोड मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून आलिया भट्ट आहे.
आलिया भट्टने लहानपणी बालकलाकार म्हणून काम केलं होतं हे फार कमी लोकांना माहिती आहे. आलियाने करण जोहरसोबत स्टुडंट ऑफ द इयरमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आलियाने 1999 मध्येच बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्याचं फार कमी लोकांना माहिती आहे. अक्षय कुमार आणि प्रिती झिंटा स्टारर सिनेमा संघर्ष 1999 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात प्रीती झिंटाच्या भूमिकेत एक गुबगुबीत गोंडस मुलगी दिसली होती. या चित्रपटातील प्रीतीची बालपणीची भूमिका सर्वांनाच आवडली होती. आलियाने प्रीतीच्या बालपणीची भूमिका त्यावेळी साकारली होती.
आलिया ही दिग्दर्शक महेश भट्ट आणि चित्रपट अभिनेत्री सोनी राजदान यांची मुलगी आहे. तिला एक बहीण शाहीन भट्ट, सावत्र बहीण पूजा भट्ट आणि सावत्र भाऊ राहुल भट्ट आहे. अभिनेता इमरान हाश्मी आणि दिग्दर्शक मोहित सुरी हे तिचे चुलत भाऊ आहेत आणि निर्माता मुकेश भट्ट तिचे काका आहेत. आलियाने मे २०११ मध्ये जमनाबाई नरसी स्कूल आयबीमधून शिक्षण पूर्ण केलं.