मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी आहेत. ज्यांचे दुनियाभरात खूप चाहते आहेत. मात्र या गोष्टीलाही नाकारलं जाणार नाही की, पाकिस्तानमध्येही टॅलेंटची काही कमी नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जी खरंतर पाकिस्तान या देशातून आहे. जी सौंदर्यांच्या बाबतीत बॉलिवूडच्या भल्या भल्या सेलिब्रिटींना टक्कर देते. या अभिनेत्रीचे पाकिस्तान प्रमाणेच भारतातही चाहते आहेत. तिने तिची सिने कारकिर्द भारतातून सुरु केली. तिने तिच्या करिअरचं पहिलं पाऊल शाहरुखच्या सिनेमातून टाकलं. आणि एका दिवसात तिचं नशिबच बदललं. मुख्य म्हणजे ही आज करोडपती आहे. एवढंच नव्हेतर ती खूप अलिशान आयुष्य जगते. ही  अभिनेत्री तिच्या देशातही खूप प्रसिद्ध आहे. पण तुम्हाला माहितीये का हा प्रवास या अभिनेत्रीसाठी अजिबात सोपा नव्हता. सिनेसृष्टीत पाऊल ठेवण्याआधी ही अभिनेत्री  दुकानात साफ सफाईही करायची.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानची ही सुंदर अभिनेत्री आहे ही मुलगी
आता येवढ्या हिंट देवूनही तुम्ही या अभिनेत्रीला ओळखू शकला नसाल  तर आम्ही आता तुम्हाला सांगणार आहोत की, आज आम्ही नक्की कोणत्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत. आज आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती दुसरी तिसरी कोणी नसून, बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री  माहिरा खान आहे. जिने शाहरुखच्या रईस या सिनेमातून डेब्यू केला आहे. नुकतीच ही अभिनेत्री लग्नबंधनातही अडकली आहे. महिरा जितकी प्रसिद्ध भारतात आहे तितकीच प्रसिद्ध ती पाकिस्तानमध्येही आहे. रईस या सिनेमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी माहिरा तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. 


तिच्यासाठी इथपर्यंत पोहण्याचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. इथेपर्यंत पोहचण्यासाठी तिने खूप संघर्ष केला आहे. सिनेसृष्टीत येण्याआधी माहिरा कॅलिफॉर्नियामध्ये तिचं शिक्षण पुर्ण करण्यासाठी गेली होती. मात्र तिथे आपला खर्च चालवण्यासाठी ती तिथल्या रेस्टॉरंटमध्ये काम करायची. ईथे ती rite aid च्या कॅशिअरपासून दुकानात झाडू पोछा करण्यापर्यंत या अभिनेत्रीने काम केलं आहे.



महिरा खान त्या अभिनेत्रींपैकी एक आहे जिची गणना पाकिस्तामधील सक्सेसफुल एक्ट्रेसपैकी केली जाते. जी छोट्या-छोट्या प्रोजेक्टसाठीही लाखो रुपये फि आकारते. माहिरा खानकडे एक अलिशान बंगला त्याचसोबत महागड्या कार आहेत. चित्रपट आणि ब्रँड एंडोर्समेंट व्यतिरिक्त, माहिरा खान एम बाय माहिरा खान नावाची क्लोदिंग लाइन देखील चालवते. हे सगळं एकत्र केलं तर तिची एकूण संपत्ती 170 कोटी रुपये आहे. असं म्हणलं जातं.