18 वर्ष लहान भाचीच्या प्रेमात पडला अभिनेता अन् लगेच केलं तिसरं लग्न; कारण सांगत स्वत:च केला खुलासा
Actor Bala Marriage : अभिनेत्यानं 18 वर्ष लहान भाचीसोबतच केलं तिसरं लग्न, अखेर कारण सांगत केला मोठा खुलासा...
South Indian Actor Marriage : अभिनेत्या ज्याचं दोन वेळा वैवाहिक आयुष्य हे अपयशी ठरलं. त्यानंतर त्यानं थेट त्याच्या सुंदर अशा भाचीशी लग्न केलं. तर लोक त्याला खूप ट्रोल करु लागले. आता त्या मागचं कारण म्हणजे एकतर ती त्याची भाची आणि दुसरी गोष्ट ती त्याच्याहून 18 वर्ष लहान. त्याची भाजी लग्नाच्या दीड महिन्यात बाळाची आई होणार होती. तर एका मुलाखतीत त्यानं सांगितलं की पुढे तो लग्न करणार नाही. पण लोकांनी दावा केला आहे की हे त्याचं चौथं लग्न आहे. तर त्यानं सगळ्या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देत त्याच्या आणि त्याच्या भाचीच्या प्रेमाचा किस्सा सांगितला.
दाक्षिणात्य अभिनेता बालानं सांगितलं की तो खरंच त्याची भाची कोकिलावर खूप प्रेम करतो. त्यामुळेच त्यानं समाजाच्या विरोधात जाऊन तिसरं लग्न केलं. ते दोघं या लग्नात आनंदी आहेत, तर त्यांना लवकरच बाळ देखील होणार आहे. त्यांनी यावेळी सांगितलं की मी एखाद्या राजाप्रमाणे माझं आयुष्य जगत आहे आणि ती एका राणीप्रमाणे. माझ्यासोबत सगळं काही योग्य होतोय. जर कोणाला माझा आनंद पाहून कसं तरी वाटत असेल तर ही त्यांची चूक आहे.
'ईटाइम्स'नुसार, बाला पुढे म्हणाला की 'जे ट्रोल करतात त्यांच्याकडे ना कार आहे नाही घर. जे लोक माझ्यावर जळतात त्यांना प्रत्येक गोष्टीची कमी आहे. कोकिला 24 वर्षांची होती आणि बऱ्याच काळापासून माझ्यासोबत होती. तो मीच आहे ज्याला उशिरानं खऱ्या प्रेमाची जाणीव झाली.'
बालाची तिसरी पत्नी कोकिला म्हणाली होती की 'मामा बऱ्याच काळापासून एकटे होते. मला त्याच्या प्रेमळ आणि दाशूर स्वभावामुळे त्यांच्यावर प्रेम झालं. ते लहान होते तेव्हापासून सगळ्यांची मदत करायचे.'
बालानं खुलासा केला की 'कोकिला तिच्या त्याच्यासाठी असलेला भावना या डायरीमध्ये लिहायची आणि तिची डायरी वाचल्यानंतर मी तिच्याशी लग्न केलं.'
हेही वाचा : नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालानं दाखवले लग्नातील Unseen Photo, नेटकऱ्यांनी केला समांथाचा उल्लेख
कोकिला आधी बालाचं पहिलं लग्न हे गायिका अमृता सुरेशशी झालं होतं. तर ते दोघं 2019 मध्ये घटस्फोट घेत विभक्त झाले. त्यानंतर त्यानं दिग्दर्शिक एलिजाबेथशी लग्न केलं. त्यानंतर जेव्हा ते विभक्त झाले त्यानंतर बालानं भाची कोकिलाशी लग्न केलं. त्यांनी 23 ऑक्टोबर रोजी लग्न केलं.