मुंबई :  ९० च्या दशकातील अभिनेत्री मधू सगळ्यांनाच माहिती आहे. या अभिनेत्रीने तिच्या अभिनयाच्या जोरावर लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. मधु ही एक अशी अभिनेत्री होती. जिने आपल्या कारकिर्दीत महत्त्वाच्या भूमिका आणि दमदार चित्रपटांनी आपल्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केलं. अवघ्या काही काळातच त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्या गाजवायला सुरुवात केली. मात्र या क्षेत्रात त्या जास्त काळ टिकल्या नाही. त्यांनी इंडस्ट्रीला कंटाळून अभिनयाला अलविदा केला. मात्र याविषयी त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलेपणानं वक्तव्य केलं आहे. त्याचं हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याविषयी बोलताना अभिनेत्रीने आपल्या करिअर बाबतीत एक वक्तव्य करत सांगितलं आहे की, ''भलेही 90 च्या दशकात चित्रपट करत असली तरी ती नेहमी आतून अस्वस्थ होती. ही इंडस्ट्री मला डिजर्व नाही करत आणि यामगचं कारण मी कधीच समाधानी नव्हती मी केवळ काम करत होती. रोजासारख्या सिनेमात काम करुनही मला हव्या तशा भूमिका मिळत नव्हत्या'' असं तिला वाटत होतं. यामुळेच तिने इंडस्ट्रीतून एक्झिट घेण्याचा निर्णय घेतला.


बऱ्याच वर्षानंतर केलं कमबॅक
बऱ्याच वर्षानंतर अभिनेत्रीने या विषयी वक्तव्य केलं. अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीला ही गोष्ट समजली की, ती एक कलाकार आहे  आणि तिने तेच काम हाती घेतलं पाहिजे जे तिला ऑफर केलंय आणि ते तिला आवडलंय. हेच कारण होतं अनेक वर्षानंतर मधूने सिनेसृष्टीत पुनरागमन केलं. याचवर्षी ती सामंथा रु प्रभूच्या शाकुंतलम या सिनेमात झळकली. मात्र हा सिनेमा विशेष काही करु शकला नाही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. याशिवाय मधु ओटीटीमध्ये डेब्यू केला आहे.


अजय देवगनसोबत हिट होती जोडी
फूल और कांटेमध्ये अजय देवगनसोबत मधुला खूप पसंती मिळाली होती. या सिनेमातील गाणी आणि फिल्म लोकांना आजही तेवढीच आवडतात. हेच कारण होतं की, अजय आणि मधूची जोडीला रोमँन्टिक एन्गलने पाहिलं जातं. अजय देवगण आजही चित्रपटांमध्ये हिरोच्या भूमिकेत दिसतो.