Aarambhi Ubale : बालकलाकार हे नेहमी आपल्या निरागस ॲक्टिंगनं प्रेक्षकांवर भुरळ घालतात. सन नेटवर्क’च्या ‘सन मराठी’ वाहिनीवरील 'सावली होईन सुखाची' या नव्या मालिकेतील बालकलाकार आरंभी उबाळे उर्फ बिट्टीनं प्रेक्षकांच्या मनात घर करायला सुरुवात केलेली आहे. उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे लहान मुलांसाठी आनंददायी काळ, मे महिन्याची सुट्टी म्हटल की लहान मुले अगदी आतुरतेनं वाट पाहत असतात. मे महिन्याचा सुट्टीत आपण पाहतो कोणी विविध उपक्रमांत सहभाग घेतात आणि नवीन गोष्टी शिकतात. या काळात अनेक जण आपल्या आजी-आजोबांकडे किंवा गावाला जातात. तिथे ते खेळ, स्वयंपाक, शेतीचे काम, आणि पारंपरिक कलेचे धडे घेतात. यंदाचा उन्हाळ्यात आरंभी उबाळे ही छोटी गोडुली घेतेय समर वॅकेशनचा पुरेपूर आनंद.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळेस बिट्टीनं म्हणजेच सावली होईन सुखाची या सन मराठीवरील बालकलाकार आरंभी उबाळे हिने एका अनोख्या अंदाजात मे महिन्याचा सुट्टीचा आनंद लुटला आहे. आरंभींने आपल्या छोट्याशा हाताची कमाल करत बनवलेत क्यूट असे क्राफ्ट्स. आरंभीला लहानपणापासूनच क्राफ्ट्स बनवण्याची आवड असल्यामुळे तिचा इवल्याशा हातांनी तिने अगदी सुंदर असे पिंकिश थीम मध्ये  छोटे कागदाचे कप, बॅग,बॉक्सेस अशा गोष्टी बनवल्या आहेत. त्यामुळे खरचं बिट्टी ने जादू केलीय असे म्हणायला हरकत नाही. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

बीट्टीनं असच समर व्हेकेशन ची मज्जा घेत खरच आपल्याला दाखवून दिले आहे की वेगळ्या अंदाजाने देखील आपण उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करू शकतो. तर अशी रंगली आहे बिट्टी ची सुट्टी. त्यामुळे आरंभी लहान मुलांसाठी नक्कीच एक प्रेरणा ठरू शकते. पाहा 'सावली होईन सुखाची' सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता फक्त आपल्या सन मराठीवर. त्यामुळे सध्या ती चांगलीच चर्चेत आहे.