मुंबई: हिंदी कलाविश्वाच्या 'फर्स्ट लेडी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्य़ा, 'शो मॅन' राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर यांचं सोमवारी वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झालं. कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचं निधन झाल्याचं वृत्त समोर आलं. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्वानेच कपूर कुटुंबियांची या दु:खाच्या प्रसंगात साथ दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संपूर्ण कपूर कुटुंबियांची कृष्णा राज कपूर यांच्या अंत्याविधीच्या वेळी उपस्थिती पाहायला मिळाली. पण, त्यांचा लाडका मुलगा ऋषी कपूर आणि नातू रणबीर मात्र यावेळी कुठेच दिसले नाहीत. 


ऋषी कपूर हे उपचारासाठी परदेशात गेले असताच त्यांना ही बातमी कळली. 


खरंतर त्यांच्यासाठी हा प्रसंग अतिशय कठिण होता. 


रणबीरचं त्याच्या आजीसोबत असणारं नातं कधीही लपून राहिलेलं नाही. 



हेच नातं पाहता आपल्या आजीच्या अंतिम प्रवासात सहभागी होता यावं यासाठी त्याची तथाकथित प्रेयसी अभिनेत्री आलिया भट्ट हिने अतिशय महत्त्वाची गोष्ट केल्याचं पाहायला मिळालं. 


'फेसटाईम'च्या माध्यमातून आलिया यावेळी रणबीरच्या संपर्कात होती. जेणेकरुन त्याला आजीचा अंत्यविधी पाहता येईल. पण, नेटव्हर्कच्या कारणामुळे त्यांचा संपर्क तुटला आणि याविषयीची खंत आलियाच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाली. 


सोशल मीडियावर या प्रसंगांचाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात आलिया जणू काही कपूर कुटुंबाचाच एक भाग असल्याप्रमाणे मोठ्या जबाबदारीने वागताना दिसत आहे.