श्रीदेवींशिवाय जान्हवी कपूरने असा साजरा झाला वाढदिवस
अभिनेत्री श्रीदेवींचे वयाच्या 54 व्या वर्षी दुबईत निधन झाले.
मुंबई : अभिनेत्री श्रीदेवींचे वयाच्या 54 व्या वर्षी दुबईत निधन झाले.
भाच्याच्या लग्नाला गेलेल्या श्रीदेवी लग्न सोहळ्यानंतर काही दिवस तेथे राहिल्या. 24 फेब्रुवारीच्या रात्री हॉटेलच्या बाथटबमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला.
आज जान्हवीचा 21 वा वाढदिवस
अभिनेत्री श्रीदेवींची मोठी मुलगी जान्हवी कपूर हीचा आज 21 वा वाढदिवस आहे. आईच्या अकाली निधनानंतर जान्हवी कपूर न खचता खंबीरपणे उभी राहिली आहे. अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूरने आज इंस्टाग्रामच्या पोस्टमध्ये जान्हवीच्या खंबीरपणाचे कौतुक करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे.
जान्हवी करणार बर्थ डे सेलिब्रिशन
जान्हवी कपूर आज आईशिवाय तिचा पहिला वाढदिवस साजरा केला आहे. जान्हवीच्या बर्थडे सेलिब्रेशनचे प्लॅन या आधीच कपूर कुटुंबियांनी केले होते. त्याप्रमाणे श्रीदेवींनी अनाथालयात वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्याचे ठरवले होते. त्यानुसार जान्हवी आज अनाथ मुलांसोबत वेळ घालवणार आहे. सोबतच रात्री खास जेवणाचा प्लॅन असल्याचे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे.
जान्हवीची खास पोस्ट
श्रीदेवींच्या निधनानंतर जान्हवी कपूरने पहिल्यांदा तिच्या मनातील भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहे. जान्हवीच्या मते ," मी आणि खुशीने केवळ आई गमावली मात्र पप्पांनी त्यांची 'जान' गमावली आहे. माझ्या वाढदिवसादिवशी तुमच्या आईवडिलांवर प्रेम करा , त्यांना तुमचा थोडा वेळ द्या. कारण त्यांच्यामुळेच तुम्ही आहात आणि माझ्या आईला (श्रीदेवी) श्रद्धांजली देताना तिच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना करा.