मुंबई : रणवीर सिंह कायमच आपल्या स्टनिंग लूकमुळे आणि अतरंगी स्टाइलमुळे चर्चेत राहिला आहे. रणवीरच्या अशा ड्रेसची किंमत काय असेल ही शंका साऱ्यांनाच पडलेली असते. त्यात आज पहिल्यांदाच रणवीर सिंहच्या लूकची किंमत समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही किंमत अतिशय धक्कादायक आहे. रणवीर सिंहचा बरबेरी लूक सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. रणवीरने अगदी डोक्यापासून ते पायापर्यंत हा बरबेरी लूक फॉलो केला आहे. रणवीर सिंहचे आपल्या फॅशनकरता मोकळे विचार आहेत त्यामुळे तो असा लूक चांगला कॅरी करतो. 



रणवीरचा हा लूक डिझायनर निताशा गौरवने शेअर केला आहे. हा फोटो शेअर केल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यामध्ये रणवीरने बरबेरी टी-शर्ट आणि त्यावर बॉम्बर जॅकेट, ट्रॅक पॅट्स आणि स्नीकर्स घातले आहेत. 




आमच्या बॉलीवूड लाइफ डॉट कॉमच्या माहितीनुसार, रणवीरच्या मोनोग्राम स्ट्रिप टी-शर्टची किंमत 33,177 रुपये आहे. तर मोनोग्राम बॉम्बर जॅकेटची किंमत 93,312 रुपये आहे. मोनोग्राम ट्रॅक पॅट्सची किंमत 51,480 रुपये असून स्नीकर्सची किंमत 33,177 रुपये आहे. म्हणजे त्यानुसार त्याचा या संपूर्ण लूककरता त्याने 2 लाख 11 हजार 146 रुपये खर्च केले आहेत.