सलमान खानला मिळालेल्या धमकीनंतर सलीम खान काय म्हणाले
सलमान खानला मिळाली धमकी
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला काही दिवसांपूर्वी लॉरेन्स बिश्नोई नावाच्या गँगस्टरने सगळ्यांसमोर जीवे मारण्याची धमकी दिली. सलमान खान जेव्हा काळ्या हरणाच्या शिकारीप्रकरणाबाबत जोधपुर कोर्टात सुनावणीसाठी गेला असता ही धमकी मिळाली. 6 मे 2018 मध्ये हरियाणा पोलिसांनी संपत नावाच्या व्यक्तीला पकडलं होतं. ज्यामधून लॉरेन्सचा संपूर्ण प्लान कळला होता. यानंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली.
सलीम खान काय म्हणाले?
नुकत्याच एका मुलाखतीत सलीन खान यांनी सलमान खानला मिळणाऱ्या धमकीबाबत आपलं मत व्यक्त केलं. सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आता सलमान खानच्या सुरक्षेसाठी खूप चांगले बॉडिगार्ड्स आहेत. सलीम खान पुढे म्हणाले की, सलमान खानला मिळणाऱ्या धमकीमुळे कुटुंबिय काळजीत नाहीत. तर ते सलमान खानला मिळणाऱ्या सुरक्षिततेबाबत चिंतेत आहेत.
ज्याची आम्हाला काळजी घ्यायची आहे. आम्हाला पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. जे आपलं काम खूप चांगल्याप्रकारे करतील. सलमान खानला जीवे मारण्याची ही पहिली धमकी नाही. या अगोदर देखील सलमान खानला धमकी देण्यात आली आहे. आम्हाला तर त्याच्या सुरक्षिततेची काळजी वाटते.