Japanese film based on Ramayana was banned in India : रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा आज झाली. आजवर आपण रामायणात अयोध्येविषयी ऐकूण होतो. मात्र, तिथे असलेला राम मंदिराचा वाद तर आपल्या सगळ्यांना माहितच आहे. अखेर अनेक वर्षांनंतर आता अखेरीस तिथे राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पण तुम्हाला माहितीये का रामायणावर आधारीत असलेला एका चित्रपटाला भारतात बॅन होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1983 ची गोष्ट असून चित्रपटाचं नाव ‘रामायण द लीजेंड ऑफ प्रिंस राम’ असं आहे. त्यावेळी जपाचे फिल्ममेकर यूगो पहिल्यांदा भारतात आले होते. भारतात आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा रामायणाविषयी ऐकलं आणि त्यानंतर त्यांनी याचा अभ्यास केला. त्यातही त्यांनी जपानी भाषेत असलेले रामायणाचे 10 व्हर्जन वाचले आणि मग त्यावर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. 


चित्रपटाचा करण्यात आलो विरोध


तब्बल सात वर्ष सगळा अभ्यास केल्यानंतर चित्रपटाच्या निर्मितीला सुरुवात झाली. मात्र, चित्रपट तयार होण्याआधीच मोठ्या वादात अडकला. खरंतर, यूगो साको यांना एनिमेटेड रामायण बनवायचं होते. तर विश्व हिंदू परिषद याला विरोध करत होती. विश्व हिंदू परिषदेचं असं म्हणणं होतं की रामायणाला कार्टूनसारखं दाखवण योग्य नाही. त्यानंतर या संबंधीत पत्र हे जपानच्या एम्बसीला पाठवण्यात आलं. त्यावर यूगो साको यांनी त्यांना सांगितलं की माझ्यावर विश्वास ठेवा कोणाच्याही भावना दुखावणार नाही. त्यानंतर काय तर यूगो साको यांनी चित्रपट बनवण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला. 


हेही वाचा : राम मंदिर सोहळ्यात गुपचुप रणबीर कपूरनं काढला कतरिना कैफसोबत फोटो?


450 आर्टिस्टनं या चित्रपटाच्या मेकिंगसाठी काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर रामानंद सागर यांच्या रामायणात श्रीराम यांची भूमिका साकारणारे अभिनेता अरुण गोविल यांनी या चित्रपटाच्या हिंदी डबिंगसाठी श्रीराम यांच्या कॉर्टून कॅरेक्टरसाठी डबिंग केलं. असा प्रकारे 1992 मध्ये संपूर्ण चित्रपट तयार झाला. मात्र, जेव्हा चित्रपट प्रदर्शित होणार होता तेव्हा बाबरी मशिदीवरून मोठा वाद सुरु झाला. हा वाद पाहता या चित्रपटाला भारतात प्रदर्शित करण्याची परवाणगी मागे घेण्यात आली. तब्बल तीन वर्ष या चित्रपटावर बॅन होता आणि त्यानंतर कार्टून नेटवर्कवर हा चित्रपट अखेर प्रदर्शित झाला. या चित्रपटाला आयएमबीडीवर 9.2 रेटिंग आहेत.