मुंबई : 'कभी खुशी कभी गम' या सिनेमाला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. करण जौहरने या चित्रपटाचं दिग्दर्शिन केलं आहे.  'कभी खुशी कभी गम'मध्ये अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरुख खान, काजोल, हृतिक रोशन आणि करीना कपूर मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 40 कोटींच्या बजेटमध्ये बनला होता, तर जगभरात 100 कोटींहून अधिक या सिनेमाने व्यवसाय केला होता. फोटोग्राफर आयशा ब्रौचाने चित्रपटाच्या पडद्यामागील काही फोटो शेअर केले आहेत. आयशाच्या या फोटोंमध्ये अमिताभ बच्चन आणि जया बच्चन तसंच गौरी खान आणि छोटा आर्यन खानचे फोटो आहेत. हे फोटो चाहत्यांना खूप आवडत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयशा ब्रौचाने 'कभी खुशी कभी गम'मधील गौरी खान आणि आर्यन खानचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत गौरी खुर्चीवर बसली आहे तर समोर छोटा आर्यन खान आहे. आर्यनने 'कभी खुशी कभी गम'मध्ये शाहरुख खानच्या बालपणीची भूमिका साकारली होती. तर आयशाने एक फोटो शेअर केला आहे ज्यात अमिताभ बच्चन आणि जया बच्चन एका सीनची रिहर्सल करत आहेत. 'कभी खुशी कभी गम' चित्रपटातील हा जुना फोटो सोशल मीडियावर चांगलाच  व्हायरल होत आहे.



'कभी खुशी कभी गम'ला 20 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी चित्रपटातील सीनवर आणि डायलॉगवर व्हिडिओ बनवले आहेत. या स्टार्समध्ये जान्हवी कपूर, आलिया भट्ट, रणवीर सिंग, अनन्या पांडे, सिद्धार्थ मल्होत्रा, फरहा खान आणि जॉनी लीव्हर यांच्या नावाचा समावेश आहे.