मुंबई : अनेक कलाकार असे आहेत ज्य़ांनी शुन्यातून आपलं नवं विश्व तयार केलंय. बॉलिवूड असो की मराठी इंडस्ट्री. अनेक कलाकार अतिशय गरीब परिस्थितीतून वर आले आहेत. असाच एक मराठी अभिनेता आहे जो सध्या चाळीत राहतोय. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात अभिनय करणारा अजूनही चाळीत राहतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना हसवणारा अभिनेता निखिल बने याने एक व्हिडिओ पोस्ट केलाय. सामान्य कुटुंबातील हा कलाकार आजही चाळीत राहत असल्यानं अनेकांनी व्यथा व्यक्त केलीये.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Nikhil Bane (@banenikhil)


महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून निखिल बनेला नवी ओळख मिळाली. निखिल बने हा भांडूपमधील एका चाळीत राहतो. त्याने त्याच्या घराचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. त्याने घराची दुरुस्ती केलीये. पण त्य़ाचं आधी घर कसं होतं आणि आता ते कसं झालंय हे तो या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे.


निखिल बने याने व्हिडिओ शेअर करताना म्हटलं की, घर नव्या पद्धतीने उभारताना चाळीतल्या लोकांची त्याला बरीच मदत मिळाली. चाळीत एकत्र राहण्याची हिच खरी मज्जा आहे. सुख असो, दुःख असो किंवा काहीही मदत असो सगळे धावून येतात.' अशा शब्दात निखिलने आपल्या चाळीतल्या मंडळींचं कौतूक केलंय.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Nikhil Bane (@banenikhil)


एकांकिका स्पर्धेच्या माध्यमातून निखिल बने याने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. आज तो एका शोमध्ये कलाकार म्हणून काम करतोय. ज्यामुळे त्याला चांगली प्रसिद्धी देखील मिळाली आहे.