मुंबई : अभिनेत्री सीमा समर्थ यांनी 'बबन' सिनेमात काम केलं आहे. त्या बँकेत नोकरीला होत्या. बँकेतील नोकरी सांभाळून त्यांनी या चित्रपटात कामं केलं होतं.  'बबन' सिनेमात काम केल्यानंतर मात्र त्यांनी बँकेतील नोकरी सोडली. सिनेसृष्टीत सक्रिय राहण्यासाठी त्यांनी बँकेतील नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. जुनी सांगवी येथील राष्ट्रीय बँकेच्या शाखा व्यवस्थापकपदी त्या कार्यरत होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधीपासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. 'बबन' चित्रपटात त्यांनी खेडे गावाच्या आजीची भूमिका साकारली होती. भाऊराव कऱ्हाडे यांनी चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारण्याची संधी दिल्याचं सीमा यांनी सांगितलं. 'बबन'मधील त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झालं. 'बबन' या सिनेमानंतर त्यांनी बँकेतील नोकरी सोडून पूर्ण वेळ अभिनयासाठी देण्याचं ठरवलं.



आता पुन्हा एकदा त्या 'हैदराबाद कस्टडी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मे महिन्यापासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होणार आहे. सह्याद्री वाहिनीवरील 'रुचिरा' या मालिकेचे सूत्रसंचालनही त्या करत आहेत. 'अभिनय ही माझी पहिली आवड. १९८१ सालापासून बँकेत नोकरी करण्यास सुरुवात केली. त्याआधी आकाशवाणी, दूरदर्शनवर छोटी मोठी कामं केली पण चित्रपटात काम करण्याची संधी बबन चित्रपटातून मिळाल्याचं' त्यांनी म्हटलंय.