मुंबई : मराठमोळ्या अभिनेत्रींनी आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडची वाट धरली आहे. अभिनेत्री सई ताम्हणकर, अमृता खानविलकर यांच्या पाठोपाठ आणखी एका मराठी अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. ही अभिनेत्री आहे पूजा सावंत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूजा सावंतनेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. सध्या सोशल मीडियावर पूजा भरपूर चर्चेत आहे. यामागचं कारण आहे तिने इंस्टाग्रामवर शेअर केलेला हा फोटो. 



पूजा सावंतने एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ती बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफसोबत दिसत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर दागिन्यांच्या जाहिरातीसाठी कतरिना आणि पूजाने फोटोशूट केलं आहे. 'कल्याण ज्वेलर्स'च्या जाहिरातीमध्ये पूजा कतरिनासोबत स्क्रिन शेअर करताना दिसत आहे.  या सुंदर फोटोची खूप चर्चा होत आहे. मराठी सिनेसृष्टीने आणि चाहत्यांनी देखील पूजाचं भरभरून कौतुक केलं आहे. 


पूजाने बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवालसोबत 'जंगली' या सिनेमात भूमिका साकारली होती. सिनेमाच्या तिच्या या भूमिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. पूजाने 'जंगली' सिनेमात शंकराची भूमिका बजावली असून तीयामध्ये महिला माहूत होती. तिच्या या भूमिकेचं देखील खूप कौतुक झालं. 


पूजाने मराठी सिनेसृष्टीत 'क्षणभर विश्रांती' सिनेमातून पदार्पण केलं. त्यानंतर तिने 'आता गं बया', 'झकास', 'सतरंगी रे', 'दगडी चाळ', 'नीळकंठ मास्तर' सिनेमात भूमिका साकारल्या आहेत. तसेच पूजा प्राणीप्रेमी असल्यामुळे कायम ती प्राण्यांसोबत देखील आपले फोटो शेअर करताना दिसते.