मुंबई : आई होणं हे प्रत्येक स्त्रीसाठी खास अनुभव असतो. असा अनुभव मराठमोळ्या अभिनेत्रीने घेतला आहे. नवीन वर्षात मराठमोळी अभिनेत्री आरती वडगबाळकर ( aarti wadagbalkar) हिच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिनं ही गुडन्यूज( good news) चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरतीने नुकताच आपल्या बाळाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये आरती, तिचा नवरा आणि बाळ असे तिघं जण आहेत. आरतीने लग्नाच्या १० व्या वाढदिवशी मिळालेलं सुंदर शुभाशिर्वाद असं म्हटलं आहे. 



आरतीने बाळाच्या जन्माच्यावेळी शेअर केली खास पोस्ट 


 2021 हे वर्ष माझ्या आयुष्यात खूप कठीण गेलं. पण तू माझ्या आयुष्यात येऊन मला आईपण दिलंस! यापेक्षा आणखी काय चांगलं असू शकतं नाही. असे म्हणत सरत्या वर्षाला निरोप देत आरती वडगबाळकर हिने मुलगा झाल्याची गोड बातमी दिली आहे.


तिच्या ह्या बातमीनंतर मराठी कलाकारांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सोबत तिनं बेबी बंपसोबतचे फोटो शेअर केले आहेत.



आरतीला सर्वजण एक उत्तम अभिनेत्री म्हणून सर्वजण ओळखतात. मात्र आरती एक बिजनेस वुमेन देखील आहे. कलरछाप या नावाने तिचा कपड्यांचा ब्रँड आहे.


स्पृहा जोशी, सायली संजीव, प्रसाद ओक, अमेय वाघ, ललित प्रभाकर, सुव्रत जोशी, सखी गोखले हे मराठी कलाकार अनेकवेळा कलरछापची जाहिरात करताना दिसले आहे.


कलाकार मंडळीच्यात हा ब्रँड चांगलाच लोकप्रिय आहे. मराठीतील अनेक अभिनेत्री अभिनयाशिवाय बिजनेस करताना दिसतात.