मुंबई : झी युवा या वाहिनीने नेहमीच आपल्या प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊन मालिकांचे सादरीकरण केले आहे आणि त्यांच्या वैविध्यपूर्ण कथांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन देखील केले आहे. झी युवा वाहिनीच्या प्रेक्षकांची ऑक्टोबरमहिन्याची सुरुवात देखील तितक्याच धमाकेदारपणे झाली कारण झी युवाने आपल्या लाडक्या प्रेक्षकांसाठी 'तू अशी जवळी रहा' आणि 'सूर राहू दे' अशा दोन नवीन आणि वेगळ्या विषयाच्या मालिका सादर केल्या. दोन्ही ही मालिकातितक्याच वेगळ्या आणि रंजक दिसत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तू अशी जवळी राहा या मालिकेत अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके हे दोघे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. नावाप्रमाणे ही मालिका एक परिकथेतील प्रेमकथा नसून ही कथा आहे वेड्या प्रेमाची. मालिकेतसिद्धार्थ बोडके राजवीर मोहिते पाटीलची भूमिका निभावणार आहे जो एक अत्यंत चाणाक्ष मुलगा आहे ज्याला पराभव मान्य नाहीये आणि दुसरीकडे तितिक्षा तावडे ही मनवाची व्यक्तिरेखा साकारणार आहे,  जी एक स्वतंत्र आणिस्वावलंबी मुलगी आहे. ही बाकीच्या प्रेमकथांपेक्षा थोडी वेगळी कहाणी आहे. ही कथा राजवीरचं मनवावर असलेल्या वेड्या प्रेमाची तर आहेच पण मनवा त्याच्या वेड्या प्रेमाला कसं जिंकणार याने मालिकेला वेगळी कलाटणीमिळणार आहे.


असामान्य प्रेमकथा हा विषय असलेली मालिका करताना तितिक्षाने तिच्या खऱ्या आयुष्यातील काही मजेदार किस्स्यांचा खुलासा केला.  तितिक्षा हि टेलिव्हिजन क्षेत्रातील एक उत्तम आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे त्यामुळे तिचाचाहतावर्ग देखील तितकाच मोठा आहे. लाइमलाईट मध्ये असलेल्या तितिक्षाला नेहमीच सोशल मीडियावर अनेक चाहते फॉलो करतात, तसेच तिला सोशल मीडियावर विचित्र आणि विनोदी मेसेजेस करतात असं देखील तिनेसांगितले. 


याबद्दल सांगताना तितिक्षा म्हणाली, "मला माझे फॅन्स अनेकदा सोशल मीडियावर मेसेज करतात त्यात ते मला 'वायफी' बोलतात किंवा मी माझ्या आईबाबांसोबत पोस्ट केलेल्या फोटोखाली ते सासू-सासरे म्हणून कॉमेंट करतात. मला असं वाटतं चाहते म्हणून ते त्यांचं माझ्यावरचं प्रेम व्यक्त करतात. मला सोशल मीडियावर फनी प्रपोजल्स येतात, पण परिस्थिती कधी हाताबाहेर नाही गेली. काही गोष्टी आपण दुर्लक्षित करून आपल्या कामावर फोकसकरायचा असतो, त्यामुळे मी अशा प्रपोजल्सकडे दुर्लक्ष करते. माझी मनवाची व्यक्तिरेखा देखील सुजाण आहे अशा परिस्थतीत ती देखील माझ्यासारखीच वागेल असं मला वाटतं"