मुंबई : बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन काही ना काही कारणाने सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. आता बिग बींनी 'मदर्स डे'चं निमित्त साधून एक खास काम केलं आहे. अमिताभ बच्चन यांनी खास 'मातृदिन'साठी एक नवं गाणं प्रदर्शित केलं आहे. बिग बींनी आपल्या ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ बच्चन यांनी झी म्यूझिक कंपनीसोबत एकत्रित एक गाणं प्रदर्शित केलं आहे. या गाण्यातून बिग बींनी जगातील सर्व मातांना नमन केलं आहे. हे गाणं अतिशय भावनिक असून सर्व शूर आणि प्रेरणादायी महिलांच्या चित्रांच्या स्लाइड शोमधून व्हिडिओची सुरुवात केली आहे.



या अतिशय भावनिक गाण्याच्या शेवटी 'तुम आज भी मेरे पास हो ... मां' असं लिहिलं आहे. या गाण्याला बिग बी आणि यजत गर्ग यांनी आवाज दिला असून हे गाणं पुनीत शर्मा, अनुज गर्ज यांनी लिहिलं आहे. झी म्यूझिक कंपनीच्या बॅनरखाली गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.