मुंबई : झी युवा ही वाहिनी नेहमीच तिच्या युथफूल आणि फ्रेश कन्टेन्टने प्रेक्षकांचे मनोरंजन करत अली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झी युवा वरील आघाडीची मालिका फुलपाखरूमधील मानस आणि वैदेहीच्या गोड प्रेमकथेने प्रेक्षकांची मनं जिंकलीआहे. त्यांच्या या स्वीट लव्हस्टोरीला प्रेक्षक देखील तितकेच रिलेट करतात. नुकतेच मालिकेच्या कथानकात आपण पाहिले की मानस आणि वैदेही यांचे नाते त्यांच्यात गैरसमजुती निर्माण करून तोडण्याचा प्रयत्न माया करतेपण त्यात ती अपयशी होते.पण माया नंतर आता या मालिकेत अजून एक रॉकी या नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे.


या व्यक्तीमुळे मानस आणि वैदहीच्या नात्यात अंतर 


अभिनेता ओंकार राऊत ही भूमिका साकारतोय. रॉकी हा वैदेही आणि मानस यांच्या कॉलेज मधील एकविद्यार्थी आहे आणि तो एक म्युजिशिअन आहे व त्याचा स्वतःचा रॉकबँड आहे. पण हा रॉकी जरा तिरसट स्वभावाचा आहे आणि म्युसिकसोबत कोणी छेडछाड केलेली त्याला अजिबात आवडत नाही. वैदेही आणि ओंकार हेदोघेही अगदी एकमेकांच्या विरुद्ध स्वभावाचे असल्यामुळे त्यांच्यात खटके उडताना प्रेक्षक पाहत आहेत. रॉकीची अखड उतरवण्यासाठी वैदेही तिच्या टीम सोबत रॉकी ज्या म्युजिक कॉम्पिटिशनमध्ये सहभागी आहे त्यातभाग घ्यायचं ठरवते आणि आपण ते कॉम्पिटिशन जिंकून दाखवू असा रॉकीला चॅलेंज देखील करते.  
  
वैदेही आणि तिची टीम ही स्पर्धा जिंकेल का? वैदेही आणि मानसच्या नात्या मध्ये रॉकी येईल का ? हे जाणण्यासाठी पहात रहा फुलपाखरु रात्री 9:00 वाजता फक्त झी युवा वर