Deepika Padukone साठी अभिनेत्यासोबतचा intimate scene नव्हता सोपा, मोठं कारण समोर
मुंबई : शकुन बत्राचा आगामी चित्रपट गहराईयान ( Gehraiyaan ) सध्या खूप चर्चेत आहे. नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपटाचा टीझर सर्वांनाच आवडला आहे, सोबतच दीपिका पादुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या धमाकेदार केमिस्ट्रीनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
टीझर समोर आल्यानंतर चाहते आणखी एका गोष्टीसाठी निर्मात्यांचे कौतुक करत आहेत. चित्रपटात इंटीमेट सीन मांडण्याचे श्रेय दिग्दर्शक दार गाई यांना देण्यात येत आहे. चित्रपटातील सिद्धांत आणि दीपिकाच्या इंटीमेट सीन्सचे दिग्दर्शन दार यांनी केले आहे.
अनेकांना प्रश्न पडला होता की इंटीमसी डायरेक्टर कोण आहे, आजकाल चित्रपटांमध्ये इंटिमेट सीन चित्रित करण्यासाठी इंटीमसी कोच नेमला जातो, जेणेकरुन ते अशा सीनच्या वेळी कलाकारांना मार्गदर्शन करू शकतील.
एकंदरीत, या दृश्यांचे चित्रीकरण करताना कलाकार तणावाखाली नसावेत आणि त्यांना असे सीन मोकळेपणाने शूट करता यावे, हा इंटीमसी कोचचा उद्देश आहे.
असे सीन कॅमेरासमोर कलाकारांना शूट करणं सोपं जावं यासाठी कोच मदत करतात.
दार गाई बद्दल सांगायचे तर, तिचा जन्म Kyiv (युक्रेन) येथे झाला. वयाच्या 10 व्या वर्षापासून, ती युक्रेनच्या इंकुनाबुला थिएटर ग्रुपशी जोडली गेली आहे. दार हिने अनेक लघुपट, म्युझिक व्हिडिओ, फीचर फिल्म्स आणि टेलिव्हिजन शोचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.
Deepika Padukone साठी अभिनेत्यासोबतचा intimate scene नव्हता सोपा, मोठं कारण समोर