मुंबई : टीव्ही अभिनेत्री-इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या बोल्डनेस आणि हॉट ड्रेसिंग सेन्ससाठी चर्चेत नेहमी चर्चेत असते. तिच्या हॉटनेसमुळे उर्फीला सोशल मीडियावर खूप ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागतं, मात्र उर्फी नेहमीच ट्रोलिंगचा सामना अगदी शांतपणे करते. मात्र यावेळी उर्फीने एका ट्रोलरवर कडक कारवाई करत मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. उर्फीने स्वतःच्या इंस्टाग्रामवर ही माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा स्वत:च स्वत:वर अपशब्द झेलणाऱ्या उर्फीला साजिद चिप्पा नावाच्या व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिल्याने तिचा राग अनावर झाला. हे सगळं वाचून उर्फीला सहन झालं नाही आणि तिने साजिदच्या मेसेजचा स्क्रीनशॉट आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला. ज्यामध्ये साजिद तिच्यासाठी अपशब्द वापरत आहे. 


स्क्रीनशॉट शेअर करत उर्फीने लिहिलं की, 'तुम्ही माझ्यासाठी वापरत असलेल्या घाणेरड्या भाषेकडे मी सहसा दुर्लक्ष करते, पण ते अस्वीकार्य आहे'.


अभिनेत्रीने पुढे लिहिलं की, 'धर्माच्या नावावर जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या या व्यक्तीविरुद्ध मी पोलिसात तक्रार दाखल करणार आहे. जो तमाम एक्स्ट्रीमिस्ट लोकांसाठी धडा असावा. साजिद तुरुंगात त्याचा आनंद घेत आहे. यासोबतच उर्फीने मुंबई पोलिसांनाही टॅग केलं आहे.



उदयपूरच्या कन्हैयालाल हत्येप्रकरणी संपूर्ण देश संतापाच्या भरात असतानाच इंटरनेट सेन्सेशन उर्फ ​​जावेदनेही या हत्येचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. आपल्या इन्स्टा स्टोरीवर व्हिडिओ शेअर करताना उर्फीने लिहिलं की, 'आम्ही कुठे जात आहोत. द्वेष पसरवावा किंवा त्याच्या नावाने कोणाचीही हत्या करावी असं अल्लाहने म्हटलं नाही.