पुरुषांमधील `हा` एका गुण Bhumi Pednekar ला करतो आकर्षित, अभिनेत्री जोडीदाराच्या शोधात
तुम्हला Bhumi Pednekar सोबत करायचयं लग्न? अभिनेत्रीला पुरुषांमधील हे गुण करतात आकर्षित
Bhumi Pednekar : बॉलिवूडची (Bollywood Actress) तरुण आणि सुंदर अभिनेत्री भूमी पेडणेकरने (Bhumi Pednekar) कमी वेळातच स्वत:चे अस्तित्व निर्माण केले आहे. तिनं तिच्या दमदार अभिनयाने चित्रपटसृष्टीत (Film Industry) एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या ती तिचा आगामी चित्रपट 'गोविंदा नाम मेरा'च्या (Govinda Naam Mera) प्रमोशनमध्ये (Promotion) व्यस्त आहे. या चित्रपटात भूमीसोबत विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कियारा अडवाणीही (Kiara adwani) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या भूमी पेडणेकरने एका मुलाखतीत (Interview) तिच्या भावी पतीबद्दल सांगितले. भूमी पेडणेकरने आपल्या स्वप्नांचा राजकुमार कसा असावा हे सांगितले. (this quality in men attracts Bhumi Pednekar an actress looking for a partner Govinda Naam Mera nz)
पतीच्या डोळ्याचा रंग...
भूमी पेडणेकर 33 वर्षाची आहे. ती अजूनही सिंगल (Single) आहे. ती खऱ्या जोडीदाराच्या शोधात आहे असं तिनं सांगितले आहे. एका मुलाखतीत भूमीला विचारण्यात आले की तिचा नवरा कसा असावा. याला उत्तर देताना भूमीने सांगितले की, तिला निळ्या किंवा हिरव्या डोळ्यांचा नवरा नको, ज्या मुलाच्या डोळ्यांचा रंग काळा असेल अशा मुलाच्या ती शोधात आहे. भूमीने तिच्या एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते की ती सहावीत असतानाच तिच्या वर्ग मित्राच्या प्रेमात पडली होती. तो मुलगा शाळेत क्रीडा कर्णधार (Sports Captain) होता. अशा पद्दतीने वयाच्या 16 व्या वर्षी तिला पहिला बॉयफ्रेंड (Boyfriend) मिळाला.
वयाच्या 16 व्या वर्षी बनवलेला पहिला बॉयफ्रेंड
भूमी तिच्या बॉयफ्रेंडसोबत पहिल्या डेटला (Movie Date) चित्रपट पाहायला गेली होती. वयाच्या 19 व्या वर्षी पहिल्यांदा मद्यपान प्यायल्याचेही भूमीने सांगितले होते. तिने मद्यपान (Alcohol) इतके प्यायली की ती 4-5 तास नाचत राहिली. सहावीतच एक मुलगा भूमीच्या प्रेमात पडला होता. तो म्हणाला की जर तू माझी नसशील तर तू दुसऱ्याची होऊ शकत नाहीस. भूमीच्या आई-वडिलांनी कधी तिला अॅडल्ट फिल्म बघताना पकडले आहे का? याला उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली की मला अद्याप पकडले नाही.