मुंबई : रणबीर कपूरच्या वाढदिवसानिमित्त नुकताच  'अॅनिमल' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटातील रणबीर कपूरचा इंटेंस लूक प्रेक्षकांना आकर्षित करत आहे. संदीप रेडी वनगा यांच्या या गँगस्टर ड्रामामध्ये रणबीर कपूरचा टफ लूक पाहायला मिळत आहे. पण तुम्हाला माहितीये का?  या चित्रपटासाठी रणबीरही पहिली पसंती नव्हती. दिग्दर्शक संदीप यांना सुरुवातीला या भूमिकेसाठी एका मोठ्या साऊथ स्टारला कास्ट करायचं होतं पण वृत्तांवर विश्वास ठेवायचा झाला तर त्याने हा चित्रपट नाकारला होता. या तेलगू सुपरस्टारने यापूर्वीही अनेक मोठ्या चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्या झलकसह 'एनिमल'चा टीझर प्रेक्षकांना आकर्षित करत आहे. चित्रपटातील रणबीर कपूरचा लूक वेगळा आहे. संदीप रेडी वंगा याआधी 'कबीर सिंग' घेऊन आला आहे आणि त्यात त्याने शाहिद कपूरसारखचं कॅरेक्टर उचलून धरलं आहे. एनिमल हा सिनेमा यावर्षी 1 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.


रणबीर कपूरची स्टाईल चाहत्यांना प्रभावित करत असेल पण जर साऊथचा सुपरस्टार नाही म्हणाला नसता तर रणबीर या चित्रपटाचा भाग झाला नसता. वृत्तांवर विश्वास ठेवयचा झाला तर, या चित्रपटाची कथा घेऊन वांगा प्रथम महेश बाबूंकडे गेले होते. त्यांना हा सिनेमा फक्त साऊथमध्ये बनवायचा होता पण जेव्हा महेश बाबूने या सिनेमाला नकार दिला तेव्हा त्याने तो हिंदीत बनवण्याचा विचार केला आणि रणबीर कपूरशी संपर्क साधला.


वृत्तांवर विश्वास ठेवायचा झाला तर, महेश आणि वंगा चित्रपटासंदर्भात भेटले होते. पण महेशला सिनेमाची कथा आवडली नाही. हे पात्र त्याच्या प्रतिमेपेक्षा वेगळं आहे आणि त्याच्या चाहत्यांना ते आवडणार नाही, असं त्याला वाटलं. त्यामुळेच त्याने हा प्रोजेक्ट नाकारला.


महेश बाबूला टॉलिवूडचा राजकुमार म्हटलं जातं आणि प्रेक्षक त्यांच्या चित्रपटांची वाट पाहत असतात. अशा परिस्थितीत महेश आपल्या चित्रपटांच्या निवडीबाबत खूप जागरूक आहे. केवळ 'एनिमल'च नाही तर त्याने यापूर्वी अनेक साऊथचे हिट चित्रपटही नाकारले आहेत. महेश बाबूने यापूर्वी रवी तेजाचा सुपरहिट चित्रपट 'इडियट' नाकारला होता. याचं दिग्दर्शन पुरी जगन्नाथ यांनी केलं होतं.


याशिवाय महेश बाबूने राणा दग्गुबतीच्या 'लीडर' या हिट चित्रपटासाठीही नकार दिला होता. या चित्रपटासाठी सुरुवातीला महेशशी संपर्क साधण्यात आला, मात्र त्याने नकार दिला. याशिवाय अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' या हिट चित्रपटासाठी महेशने नकार दिला आहे. या चित्रपटाची कथा घेऊन सुकुमार याआधी त्यांच्याकडे गेले होते पण त्याने तेव्हाही नकार दिला होता.


याशिवाय एआर मुरुगोदास यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'गजनी'ही महेशने नाकारला होता. या चित्रपटासाठी त्याची पहिल्यांदा चर्चा झाली पण महेशला स्क्रिप्ट इतकी आकर्षक वाटली नाही. यानंतर सूर्याला चित्रपटात कास्ट करण्यात आलं आणि तो त्याच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरला. यानंतर आमिर खानसाठी हा चित्रपट खूपच फायदेशीर ठरला. महेश बाबू यांचा जन्म 9 ऑगस्ट 1975 रोजी झाला होता. एका चित्रपटासाठी तो 60 ते 80 कोटी रुपये घेतो आणि त्याची एकूण संपत्ती 256 कोटी रुपये आहे.