मुंबई : बॉलिवूडमध्ये स्टार किडला मिळणारी लोकप्रियता आपल्याला माहितच आहे. पण आता मराठीत देखील स्टार किडला अधिक पसंती मिळत असल्याचसमोर येत आहे. कोठारे कुटुंबात काहीच महिन्यांपूर्वी एका गोंडस मुलीचा जन्म झाला. आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांनी आपल्या मुलीचं नाव जिजा ठेवलं. सध्या ही जिजा प्रत्येकालाच आवडत आहे. जिजाचे फोटो सोशल मीडियावर अधिक पसंतीला येत आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपण पाहिलं आहे बॉलिवूड बेबोने आपल्या तैमूरला अगदी या वयातच जिममध्ये पाठवलं आहे. तसंच उर्मिलाने आपल्या या लहानग्या जिजाला वयाच्या अडीच महिन्यापासूनच स्विमिंगचे धडे दिले आहेत. उर्मिला आपल्या या जिजासोबत स्विमिंग करताना दिसत आहे. खास गोष्ट म्हणजे जिजा देखील स्विमिंग एन्जॉय करत आहे. 





उर्मिला कोठारे आपल्या गरोदरपणातील दिवसात सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होती. तिने अगदी या दिवसांतील योगा किंवा तिचे बेबी शॉवरचे फोटो देखील शेअर केले होते. त्यामुळे कोठारे कुटुंबाचे फॅन्स उर्मिलाला फॉलो करत होते. आणि आता त्यांना जिजाच्या पोस्ट अतिशय आवडत आहेत. आणि चाहते त्या पोस्ट खाली कमेंटकरून आपली प्रतिक्रिया कळवत आहेत.