एकाच अभिनेत्याला ऑफर झाले होते Animal आणि Sam Bahadur; मग का दिला नकार?
This star world have seen in Animal and Sam Bahadur : रणबीर कपूरच्या `ॲनिमल` आणि विकी कौशलच्या `सॅम बहादुर` चित्रपटात हे दोघं कलाकार नाही तर बॉलिवूडचा हा लोकप्रिय कलाकार दिसला असता.
This star world have seen in Animal and Sam Bahadur : 1 डिसेंबर रोजी दोन बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित झाले. त्या दोन्ही चित्रपटांविषयी काही वेगळं सांगायची गरज नाही. त्यापैकी एक हा 'ॲनिमल' आहे आणि दुसरा चित्रपट विकी कौशलचा 'सॅम बहादुर' आहे. हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले आणि प्रेक्षकांमध्ये धांदल उडाली कारण त्यांना कोणता चित्रपट पाहावा हे कळत नव्हतं. अशात या दोन्ही चित्रपटासाठी दिग्दर्शक आणि निर्मात्यांची पहिली पसंत दुसराच अभिनेता होता. चला तर जाणून घेऊया कोण आहे तो कलाकार.
संदीप रेड्डी वांगाच्या 'ॲनिमल' चित्रपटानं चार दिवसात 400 कोटी कमावले तर मेघना गुलजारच्या 'सॅम बहादुर' चित्रपटानं खूप चांगली कमाई केली नाही. पण तो पडद्यावर पडलाही नाही. 'सॅम बहादुर' नं चार दिवसात 29.05 कोटींची कमाई केली. प्रेक्षकांनी या दोन्ही कलाकारांचा दर्जेदार असा अभिनय पाहिला. तर प्रेक्षकांनी रणबीर आणि विकी या दोघांच्या अभिनयाची स्तुती केली. पण तुम्हाला माहितीये का? संदीप रेड्डी वांगा आणि मेघना गुलजार या दोघांची पहिली पसंती हा अभिनेता रणवीर सिंग होता. त्यामुळे या दोन्ही चित्रपटात आपल्याला रणवीर सिंग दिसला असता. पण नक्की काय झालं की त्यानं या चित्रपटांना नकार दिला.
'सॅम बहादुर' साठी मेघना विकी कौशलकडे जाण्याआधी तिनं या भूमिकेसाठी रणवीर सिंगला पसंती दिली होती. पण तो त्यावेळी 83 या चित्रपटात व्यस्त होता आणि अशात लगेच दुसरी बायोपिक करायला हवी की नाही या विचारात तो होता. त्यामुळे तो या चित्रपटात दिसला नाही. त्याशिवाय त्यानं करण जोहरच्या तख्त या चित्रपटासाठी आधीच तारखा दिल्या होत्या. त्यामुळे तो 'सॅम बहादुर' ला वेळ देऊ शकणार नव्हता.
हेही वाचा : रोज भांडणं व्हायची! ऐश्वर्यानं खुलासा करताच अभिषेकनं सांगितलं सत्य
रिपोर्ट्सनुसार, संदीप रेड्डी वांगाच्या 'ॲनिमल' विषयी बोलायचे झाले तर त्यांनी रणवीरला या चित्रपटासाठी विचारले होते. त्याआधी म्हणजेच कबीर सिंग करत बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी देखील त्यांनी रणवीरला विचारले होते. दरम्यान, रणवीरला चित्रपटातील ती भूमिका आणि विषय खूप डार्क आहे असं वाटू लागलं आणि त्यामुळे त्यानं चित्रपटाला नकार दिला.