Child Artist : बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील कपूर कुटुंब हे किती चर्चेत असतं याविषयी काही वेगळी माहिती देण्याची इच्छा नाही. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात. सध्या कपूर कुटुंबातील चर्चेत असलेली व्यक्ती म्हणजे राहा आहे. राहा ही फक्त कपूर कुटुंबातील चर्चेत असलेली नाही तर स्टार किड्समध्ये चर्चेत असते. आज आपण राहाशी कनेक्शन असलेल्या व्यक्तीविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल मीडियावर एक थ्रोबॅक फोटो चांगलाच व्हायरल होतोय. या फोटोत असलेल्या व्यक्तीचा संबंध थेट राहाशी आहे. सध्या सोशल मीडियाव एक ब्लॅक अॅन्ड व्हाइट फोटो व्हायरल होतोय. हा फोटो आग्राच्या ताजमहलसमोरचा आहे. ताजमहलसमोर तीन मुलं पोज करताना दिसत आहेत. त्या तिघांना पाहून तुम्ही थोडं तरी ओळखू शकला असाल की हे कोण आहेत. जर तुम्हाला अजून लक्षात आलं नसेल की हे कोण आहेत तर फोटोच्या उजव्या बाजुला असलेली व्यक्ती हे रणधीर कपूर आहेत. त्यांच्या शेजारी उभी असलेली मुलगी रितू कपूर आहेत. तर त्यांच्या शेजारी असलेली व्यक्ती दुसरी कोणी नसुन ऋषि कपूर आहेत. ऋषि कपूर यांना पाहिल्यानंतर त्यांच्यातली थोडी झलक ही राहामध्ये दिसते असे अनेकांना वाटते. 


ऋषि कपूर यांच्याविषयी बोलायचे झाले तर त्यांचं नाव हे सगळ्यात व्हर्सेटाइल कलाकारांमध्ये घेतले जाते. त्यांनी एक चाईल्ड आर्टिस्टच्या म्हणून 1970 मध्ये त्यांचे वडील राज कपूर यांच्या मेरा नाम जोकर मध्ये काम केलं होतं. त्यात त्यांनी राज कपूर यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांना लीड अॅक्टर म्हणून 1973 मध्ये बॉबी चित्रपटात काम केलं. या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये असं पदार्पण केलं की त्यांना बेस्ट अॅक्टरचा फिल्म फेअरचा पुरस्कार मिळाला होता. ऋषि कपूर यांनी 1973 ते 2000 पर्यंत तब्बल 92 चित्रपट केले. या चित्रपटात त्यांनी रोमॅन्टिक हिरोची भूमिका साकारली. तर त्यापैकी 12 चित्रपटांमध्ये तर नीतू कपूर यांनी त्यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. 


अभिनयाशिवाय दिग्दर्शनही केलं


ऋषि कपूर यांनी अभिनयासोबतच दिग्दर्शनात देखील त्यांचं नशिब आजमावलं. त्यांनी 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या आ अब लौट चलें या चित्रपटात दिग्दर्शन केलं. इतकंच नाही तर अग्निपथसाठी ऋषि कपूर यांनी बेस्ट निगेटिव्ह भूमिकेसाठी पुरस्कार मिळाला होता. ऋषि कपूर यांचा अखेरचा चित्रपट हा शर्माजी नमकीन होता. त्यांनी 30 एप्रिल 2020 रोजी चित्रपटसृष्टीला राम राम केला. त्यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला होता.